सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. संवाद
  4. »
  5. मुलाखत
Written By वेबदुनिया|

इंटरनॅशनल सेलिब्रिटी शिल्पा शेट्टी

बॉलीवूडच्या प्रवासात नेहमी वादाच्या भोवर्‍यात सापडलेली शिल्पा अचानक 'बिग ब्रदर' रियलिटी शोची विजेता बनून रातोरात 'इंटरनॅशनल सेलिब्रिटी' झाली. आता ती 'बिग बॉस -2' ची होस्ट झाल्याने सध्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या 'इंटरनॅशनल' भरारीबाबत शिल्पाशी केलेली बातचीत....

प्रश्न : तू नेहमी वादाच्या भोवर्‍यातच असते, असे का ?
उत्तर : हा तर मला मीडियाकडून मिळालेला 'कृपाप्रसाद' आहे. काही नसताना मीडिया वाद उभा करतो व जनतेला तोंड आम्हालाच द्यावे लागते. 'बिग बॉस' वरूनही आधी मीडियानेच वादळ उठवले. त्यामुळे त्यात सहभागी व्हवे लागले. याला नशीबाचा भाग समजून मी त्याविषयी जास्त विचार करत नाही.

प्रश्न : मोनिका बेदी व राहुल महाजनला बिग बॉसमध्ये आणण्याचे कारण काय?
उत्तर : मोनिकाला पाहण्यासाठी लोक उत्सुक होते. मोनिका व राहुल आधीच चर्चेत होते. त्यांना जनतेपर्यंत पोहचण्यासाठी एक चांगला प्लॅटफार्म हवा होता. माझ्या मते त्या दोघांना तो 'शो' अधिक फायदेशीर ठरला असावा. माझ्यासाठी मोनिकाची विविध अंगानी ओळख होणेही तितकेच महत्त्वाचे होते.

प्रश्न : तुझे चित्रपटापासून दूर जाण्याचे कारण काय?
उत्तर : मला नाही वाटत की, मी चित्रपटापासून दूर जात आहे. हे खरं आहे की, 'मेट्रो' व 'अपने' या चित्रपटानंतर मी जास्त चमकली नाही. कारण त्यावेळी युकेमध्ये माझे म्युझिकल शो सुरू होते. त्यामुळे गॅप पडला असेल. आता तर माझे चाहते मला फेब्रुवारीमध्ये माझ्या होम प्रोडक्शनच्याच फिल्ममध्ये पहातील. त्याआधी 'रुखसाना'मध्ये पाहुणे कलाकार म्हणून मी येणार आहे. खरं सांगायचे झाले तर मी आयटम सॉंग करणे बंद केले होते. माझ्या फॅनच्या मागणीवरून एक सॉंग केले आहे. या व्यतिरिक्त सनी देओलच्या होम प्रोडक्शनच्या एका चि‍त्रपटातही काम केले आहे.

WD
प्रश्न : तुला मॉडेलिंगमध्ये जास्त रूची दिसते?
उत्तर : नाही, असं काही नाही. काही दिवसासाठी मी मॉडेलिंगच्या क्लासला गेली होती, हे खरे आहे. मात्र मला प्रत्येक गोष्टीत परफेक्ट व्हायला आवडते. आता तर मी व्हायलेनही शिकले आहे. मला माहित आहे की, मी समजते तेवढे हे सोपे नाही, परंतु मी ते शिकण्याचा माझा प्रयत्न सुरू आहे.

प्रश्न : तुझी योगासनाची सीडी बाजारात आली आहे, या मागे तुझा काय हेतू ?
उत्तर : योगसनाची सीडी चांगला बिझनेस करत आहे. नागरीकामध्ये योगासनाच्या प्रति जागरूकता निर्माण व्हावी हाच त्यामागचा माझा हेतू आहे. तसे पाहिले तर, आम्ही आधी आंतरराष्ट्रीय स्तरावर काढली होती. भारतात सीडी रिलीज झाल्यानंतर असे दिसले की, युवापिढीकडून योगासनाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे.

प्रश्न : योगासनापासून तुला काय फायदे झाले?
उत्तर : मला योगापासून खूप फायदे झाले आहेत. जेव्हा चाहते माझ्याकडे पाहतात, तेव्हा मी त्यांना हक्काने सांगते, हे तर योगाभ्यासाचे योगदान आहे. माझी मान दुखायची. तेव्हापासून मी योगासने सुरू केली. योगासनाचे फायदे स्वत: अनुभवल्यानंतर त्याला व्यावसायिक स्वरूप दिले.

प्रश्न : कुठलीही आपत्ती आल्यास बॉलीवूड काय भूमिका बजावते ?
उत्तर : पूर, बॉम्बस्फोट या सगळ्यातील आपदग्रस्तांच्या मदतीसाठी फिल्म इंडस्ट्रीकडून फंड गोळा करणे आदी कामांमध्ये मी नेहमी सहभागी होते. कारगिल युद्धावेळीही आम्ही खूप मदत पाठ‍वली होती.