1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय

प्रविणसाठी प्रमोद महाजन ''खलनायक''

प्रविणसाठी प्रमोद महाजन खलनायक
PTIPTI
भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या हत्येप्रकरणी तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगणारा त्यांचा भाऊ प्रविण याने तुरुंगात आत्मचरित्र लिहिले असून, यात त्याने प्रमोद यांच्यावर पुन्हा आरोपांच्या फैरी झाडत नव्या वादाला जन्म दिला आहे.

22 एप्रिल 2006 रोजी प्रविणने प्रमोद यांच्या निवासस्थानी त्यांच्यावर गोळ्या झाडल्यानंतर प्रमोद यांचा रुग्णालयात मृत्यू झाला होता. या प्रकरणी प्रविणला न्यायालयाने जन्मठेपाची शिक्षा सुनावली असून, तुरुंगात असताना प्रविणने आत्मचरित्र लिहिले आहे.

महाराष्ट्रातील एका वृत्तपत्राने प्रविणच्या 'अल्बम' या पुस्तकातील काही अंश प्रकाशित केल्याने खळबळ उडाली आहे.

प्रविणने आपल्या पुस्तकात प्रमोद यांच्यावर वादग्रस्त टीका केली असून, त्यांना खलनायक या भूमिकेतून प्रविणने आपल्या पुस्तकात रंगवले आहे.

प्रमोद यांचे मंत्रिपद जाण्यासाठी खरे कारण, त्यांचा संघ आणि भाजपतील ज्येष्ठ नेत्यांवर असलेला दबाव, त्यांच्या अनेक भानगडी असल्याचा आरोपही प्रविणने आपल्या पुस्तकात केला आहे.

प्रमोद महाजन यांच्या पत्नी रेखाही त्यांच्या स्वभावाला कंटाळल्या होत्या. त्यांना प्रमोद यांच्याकडून घटस्फोट हवा होता असा आरोपही प्रविणने आपल्या पुस्तकात केला आहे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा