Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 6 ऑक्टोबर 2010 (08:30 IST)
कॉमनवेल्थच्या नियोजनावर कागारुंचे आरोप
कॉमनवेल्थ गेम्सच्या नियोजनावर पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियन संघाने आरोप केले आहेत. उद्घाटन समारंभाच्या दिवशी आपल्यासोबत अत्यंत वाईट व्यवहार करण्यात आल्याचे ऑस्ट्रेलियन दलाचे प्रमुख स्टीव्हन मोनेगेट्टी यांनी म्हटले आहे.
आपल्यासोबत करण्यात आलेल्या व्यवहाराने संघ नाराज असून, भविष्यात अशा प्रकारच्या कोणत्याही समारोहात सहभागी व्हायचे का नाही ते ठरवावे लागेल या शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
भारतीय नियोजन समितीने ऑस्ट्रेलियन दलाचा अपमान केला असून, आपण यामुळे निराश झालो असल्याचे त्यांनी म्हटले आहे.