तुम्हाला माझा राजीनामा हवाय का?
माझ्या राजीनाम्याच्या वेगवेगळ्या शक्यता वर्तवून मला पुन्हा-पुन्हा राजीनामा कधी देणार विचारून तुम्हाला काय साधायचंय? तुम्हाला माझा राजीनामा हवा आहे काय?, असा त्रस्त सवाल लोकसभा सभापती सोमनाथ चॅटर्जी यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना विचारला. सोमनाथ चॅटर्जी लोकसभा सभापतिपदाचा राजीनामा कधी देणार यावर रोजच वेगवेगळ्या चर्चा ऐकायला मिळत असून एका चर्चेनुसार ते मंगळवार रात्रीनंतर पदत्याग करणार अशी शक्यता वर्तविली जात होती. त्याबददल त्यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रश्न केला असता वैतागून त्यांनीच उपस्थित पत्रकारांना प्रश्न केला.