काय सांगता, कोरोना झाला "सुपर स्प्रेडर"अशी काळजी घ्या
यंदा कोरोना झाला सुपर स्प्रेडर, लक्षणे देखील वेगळीच आणि फसवी आहे. या पूर्वी कोरोना बाधितांमुळे एक ते दोन संसर्ग होत होते. कोरोनाचा प्रादुर्भाव सगळीकडे वाढतच आहे. कोरोना ने यू टर्न घेतला आहे. यंदाचा हा व्हायरस यूके मधून आलेला आहे. परंतु हा पुन्हा येणार विषाणू पूर्वीपेक्षा देखील अधिक घातक आणि संसर्गजन्य आहे.
म्हणजेच 'सुपरस्प्रेडर' याचा अर्थ आहे की हा झपाट्याने लोकांना संक्रमित करतो आणि सर्वांना बाधित करतो.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, जानेवारी महिन्यात एक संक्रमित रुग्ण दोन लोकांना संक्रमित करत होता. तर फेब्रुवारी मध्ये एका व्यक्तीकडून सुमारे 5 लोक आजारी पडण्यास सुरू झाले. मार्च मध्ये एका कोरोनारुग्णांकडून 7 ते 8 लोक संक्रमित होत आहे. ही एक धक्कादायक बाब आहे.
हे समजून घ्या की या पूर्वी घरातील एका सदस्याला कोरोनाची लागण लागली असल्यास त्याच्या मुळे घरातील एका किंवा दोन सदस्यच संक्रमित होत होते.परंतु या कोरोनाच्या नवीन विषाणूमुळे संपूर्ण परिवाराचं कोरोना बाधित होत आहे. म्हणजे संसर्गाची वाढ झपाट्याने आहे.
डॉ.समीर माहेश्वरी (एमबीबीएस, एमडी मेडिसिन) या बाबत स्पष्ट करतात की व्हायरसचे हे नवीन म्यूटेशन पूर्वीपेक्षा जास्त अधिक संसर्गजन्य आहे. हे एका व्यक्ती मधून अधिक लोकांमध्ये वेगाने पसरत आहे. आपण याला सुपर स्प्रेडर म्हटले तर अजिबात चुकीचे नाही. डॉ, समीर म्हणाले की हा यूके मधून आलेला स्ट्रेन सांगत आहे.
याची लक्षणे फसवी आहे -
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, या पूर्वी या विषाणूंची लक्षणे सर्दी,खोकला, ताप,चव आणि वास येण्याची क्षमता कमी होणे अशी लक्षणे आढळत होती.परंतु आता असे काही नाही. आता या नवीन कोरोना स्ट्रेन विषाणू लक्षणे बदलून फसवणूक करत आहे.तज्ज्ञांनी सांगितले की आता सर्दी,खोकला आणि तापासह, कमकुवतपणा, पोटात वेदना,आणि अतिसार सारखे लक्षणे देखील या मध्ये समाविष्ट झाली आहे. जर आपल्याला देखील यापैकी कोणतेही लक्षणे आढळली तर त्वरितच डॉक्टरांशी संपर्क करावे.