शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Updated : शुक्रवार, 5 मार्च 2021 (16:14 IST)

लातूरमध्ये लग्न समारंभ आणि धार्मिक कार्यक्रम कोरोनाचा सुपर स्प्रेडर ठरतायत का?

लातूरमधील लग्न वऱ्हाड्यातील नवरदेव आणि त्याच्या आईसह २३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर दुसऱ्याबाजूला लातूरमधील अहमदपूर तालुक्यातील चिखली येथील एका धार्मिक कार्यक्रमामधील एकत्र आलेल्या लोकांपैकी तब्बल १३ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे लातूरमधील कोरोनाबाधितांची संख्येत आता मोठी भर पडली आहे. अहमदपूरमधील कोविड केअर सेंटर देखील सुरू करण्यात आले आहे.
 
 अहमदपूर तालुक्यातील वऱ्हाड लग्नासाठी लातूर आले होते. या वऱ्हाड्यातील नवरदेव आणि आईसह इतर २३ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. तसेच अहमदपूर तालुक्यातील चिखली गावातील एका धार्मिक कार्यक्रमामुळे एकत्र आलेल्या तब्बल १३ जणांना कोरोनाची लागण झाली.