शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 3 मार्च 2021 (16:02 IST)

भाजपकडून विधिमंडळाच्या पायरीवर बसून जोरदार घोषणाबाजी

विधानसभा अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी भाजपकडून विधिमंडळाच्या पायरीवर बसून जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. शेतकऱ्यांना सरसकट पीकविमा मिळाला पाहिजे. कोकणातील शेतकऱ्यांना चक्रीवादळ आणि अतिवृष्टीत प्रचंड नुकसान झाले या शेतकऱ्यांना सरकारने अल्प मदत केल्याने सरकाचा निषेध करण्यात आला. ठाकरे सरकार हाय हाय, शेतकऱ्यांना फसवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा देण्यात आल्या विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. 
 
कोकणामध्ये निसर्ग चक्रीवादळामुळे आणि नैसर्गिक आपत्तीमध्ये उध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला सरकारने अत्यल्प अशी मदत केल्यामुळे सरकारचा जाहीर निषेध या आंदोलनात करण्यात आला आहे. कोकणातील उध्वस्त झालेसल्या शेतकऱ्यांसाठी एका मागे एक भूमिका घेतली परंतु मदत अत्यल्प मदत केल्यामुळे भाजप नेत्यांनी विधीमंडळाच्या पायरीवर बसून आंदोलन केले आहे.