शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कसे कराल
Written By
Last Modified: मंगळवार, 23 फेब्रुवारी 2021 (15:25 IST)

PF बॅलन्स चेक करणे सोपे, जाणून घ्या फायदे

ईपीएफओ आपल्या ग्राहकांना अनेक ऑनलाईन सुविधा प्रदान करतं. ज्याच्या मदतीने ईपीएफ ग्राहकांना त्यांच्या खात्याची तपासणी करण्यास होते. आता पीएफ निकासी, स्थानांतरण आणि इतर माहिती जाणून घेणे देखील सोपे झाले आहे. आपण सोप्यारीत्या माहीत करू शकता की आपल्या ईपीएफ अकाउंटमध्ये व्याजासह आतापर्यंत किती रक्कम जमा झाली आहे आणि आपण आम्ही सांगत असलेल्या सोप्या पद्धतीने बॅलन्स चेक करू शकता. आपण चार प्रकारे बॅलन्स चेक करू शकता. होय ईपीएफओ अॅप, उमंग अॅप, एसएमएस आणि मिस कॉल या द्वारे बॅलन्स चेक करता येईल.
 
SMS द्वारे चेक करा 
एसएमएस द्वारे बॅलन्स चेक करण्यासाठी आपल्याला आपल्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरने 7738299899 वर संदेश पाठवायचा आहे. एसएमएस मध्ये EPFOHO UAN ENG लिहून 7738299899 वर मेसेज करावा लागेल. ENG त्या पहिल्या तीन अक्षरांबद्दल माहिती आहे ज्या भाषेत आपल्याला माहिती जाणून घेण्याची इच्छा असेल. मेसेजची सुविधा इंग्रेजी, हिंदी, पंजाबी, गुजराती, मराठी, कन्नड, तेलुगू, तमिळ, मल्यालम आणि बंगाली भाषांमध्ये उपलब्ध आहे. मेसेजद्वारे ईपीएफओ बॅलन्स जाणून घेण्यासाठी आपला मोबाइल नंबर यूएएनसह रजिस्टर्ड असणे आवश्यक आहे.
 
EPFO App द्वारे चेक करा
ईपीएफओ अॅपमध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ईपीएफओ वेबसाइट https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ वर जा. आपला यूएएन नंबर, पासवर्ड आणि कैप्चा टाकून लॉग-इन करा. मॅनेजवर क्लिक करा. केव्हाईसी ऑप्शनवर सर्व माहिती चेक करू घ्या. ऑनलाईन सर्व्हिसवर क्लिक करा. एक ड्रॉप मेन्यू उघडेल. याहून क्लेमवर क्लिक करा. आपला क्लेम फॉर्म सबमिट करण्यासाठी Proceed For Online Claim वर क्लिक करा.
 
Missed Call द्वारे चेक करा
मिस्ड कॉलद्वारे ईपीएफ चेक करण्यासाठी आपला मोबाइल नंबर यूएनहून रजिस्टर्ड असणे आवश्यक आहे. आपण आपल्या रजिस्टर्ड मोबाइलहून 011-22901406 वर मिस्ड कॉल देऊन ईपीएफ बॅलन्स जाणून घेऊ शकता. मिस्ड कॉल दिल्यावर आपल्या रजिस्टर्ड नंबरवर ईपीएफचा एक मेसेज येईल ज्याने आपल्याला ईपीएफ बॅलन्सबद्दल माहिती मिळेल. मेसेजमध्ये पीएफ नंबर, नाव, जन्मतिथी, ईपीएफ बॅलन्ससह शेवटी जमा रक्कम सांगितली जाते.
 
UMAG App द्वारे चेक करा
उमंग अॅपमध्ये आपल्याला ईपीएफओ पर्यायावर क्लिक करायचे आहे. ईपीएफओवर क्लिक केल्यानंतर आपल्याला 'Employee Centric Services' पर्यायावर जायचे आहे. यानंतर आपल्याला व्यूह पासबुकवर क्लिक करायचे आहे. View Passbook वर क्लिक केल्यानंतर आपल्याकडून यूएएन नंबर मागितले जाईल. आपला यूएएन (यूनिवर्सल अकाउंट नंबर) नंबर नोंदवा. यूएएन नंबर टाकल्यावर Get OTP वर क्लिक करा. यानंतर आपल्या रजिस्टर नंबरवर ओटीपी पाठवला जाईल. मोबाइलवर आलेला ओटीपी टाका आणि Login वर क्लिक करा यानंतर आपल्याला कंपनीचं नाव दिसेल यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर लगेच आपल्यासमोर पासबुक उघडेल.