गुरूवार, 22 फेब्रुवारी 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कसे कराल
Written By
Last Modified: बुधवार, 10 फेब्रुवारी 2021 (13:06 IST)

नोकरी बदल्यावर PF खात्यामध्ये घरबसल्या करा अपडेट

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ग्राहकांना ऑनलाइन सुविधा प्रदान करत आहे. या सुविधेमुळे अगदी सोप्या पद्धतीने घरबसल्या अनेक कामं करता येऊ शकतात. ईपीएफओमध्ये क्लेम करून हक्काचे पैसे देखील अगदी सहज मिळवता येतात. क्लेम करण्याव्यतिरिक्त EPFO ने आणखी सुविधा प्रदान केली आहे. आता नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यामध्ये नोकरी सोडल्याची तारीख अर्थात डेट ऑफ एक्झिट अपडेट करण्यासाठी कंपनीमध्ये जाण्याची गरज नाही. आता कर्मचारी स्वत: ही तारीख अपडेट करू शकतात. 
 
ऑनलाइन पद्धतीने हे काम अगदी सोप्यारीत्या पूर्ण करता येतं. जाणून घ्या पद्धत- 
फॉलो करा या सोप्या स्टेप्स
 
सर्वात आधी https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ या लिंकवर क्लिक करा. 
येथे UAN आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा. 
Manage वर जाऊन Mark Exit वर क्लिक करा.
ड्रॉप डाऊन अंतर्गत select employment मधून PF Account Number निवडा. 
मग Date of Exit आणि Reason of Exit यात तपशील भरा.
नंतर Request OTP वर क्लिक करा. 
आधारशी लिंक्ड असणाऱ्या मोबाइल क्रमांकावर आलेला OTP भरा. 
नंतर चेकबॉक्स सिलेक्ट करून अपडेटवर क्लिक करा.
Ok केल्यानंतर Date of Exit अपडेट होईल.
 
या सोप्या पद्धतीने नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यामध्ये नोकरी सोडल्याची तारीख अर्थात डेट ऑफ एक्झिट अपडेट करता येईल.