राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन १ ते १० मार्च पर्यंत होणार
विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठक पार पडली. या बैठकीत अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी ठरवण्यात आला. राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन १ ते १० मार्च पर्यंत होणार, अशी माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. दरम्यान, विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक होणार नाही. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ कामकाज चालवणार आहेत. राज्याचा अर्थसंकल्प 8 मार्चला मांडला जाणार आहे. अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणानं होणार आहे.
असं आहे राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन
1 मार्च : राज्यपालांच्या अभिभाषणानं अधिवेशनाला सुरुवात होईल. त्यानंतर राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल आभार प्रदर्शनाचा प्रस्ताव मांडण्यात येईल. 2020-21 च्या पुरवणी मागण्या पटलावर ठेवल्या जातील. तर अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवले जातील.
2 मा्र्च : या दिवशी विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सभागृहांचं शासकीय नियमाप्रमाणं कामकाज होईल. तर राज्यपालांच्या अभिभाषणावर पहिल्याद दिवसाची चर्चा सुरु होईल.
3 मार्च : या दिवशी दोन्ही सभागृहात राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा होईल. या दिवशी अभिभाषणावरील चर्चा संपेल.
4 मार्च: दोन्ही सभागृहांमध्ये 2020-21 च्या पुरवणी मागण्यांवर चर्चा आणि मतदान घेतले जाईल. अशासकीय कामकाज देखील सुरु राहणार आहे.
5 मार्च : दोन्ही सभागृहांमध्ये 2020-21 च्या पुरवणी मागण्यांवर चर्चा आणि मतदान घेतले जाईल. अशासकीय कामकाज देखील सुरु राहणार आहे. तर पुरवणी विनियोजन विधेयक मांडले जाईल.
6 आणि 7 मार्चला विधिमंडळाला सुट्टी.
8 मार्चला अर्थसंकल्प
8 मार्च : दोन्ही सभागृहांचे शासकीय कामकाज सुरु होईल. सन 2021-22 चा अर्थसंकल्प दोन्ही सभागृहात सादर केला जाईल.
9 मार्च : दोन्ही सभागृहांचे शासकीय कामकाज सुरु राहील.
10 मार्च : दोन्ही सभागृहांचे शासकीय कामकाज सुरु होईल. अर्थसंकल्पावर सर्वसाधारण चर्चा केली जाईल. यादिवशी अर्थसंकल्पीय अधिवेशन संपणार आहे.