शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 25 फेब्रुवारी 2021 (20:42 IST)

परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत काही काळ शाळा बंद ठेवा : वर्षा गायकवाड

राज्यातील काही जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता स्थानिक प्रशासनाने जिल्ह्याच्या परिस्थितीनुसार १ मार्च २०२१ पासून आवश्यकता भासल्यास आणि परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत काही काळ शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा, असे निर्देश शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत.
 
विद्यार्थी आणि शिक्षक यांची सुरक्षितता याला सर्वोच्च प्राधान्य आहे. ज्या शाळांमध्ये कोरोना प्रादुर्भाव आढळून आला आहे. तिथे आवश्यक स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करण्याची कार्यवाही करण्याबाबत स्थानिक प्रशासनास सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती वर्षा गायकवाड दिली आहे.
 
तसेच राज्यात काही जिल्ह्यातील शाळांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांत कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता मी समाजकल्याण मंत्री आणि आदिवासी मंत्री, कल्याण विभाग यांच्याशी चर्चा करत आहे. याबाबत राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या शिक्षणाधिकारी यांच्याकडून जिल्हानिहाय आढावा घेण्यात येत आहे, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.