बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 6 मार्च 2021 (08:18 IST)

कोल्हापुरात अंधश्रद्धेचा बाजार, निवडणुकीत तिकीट कापण्यासाठी चक्क काळी जादू

कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत तिकीट कापण्यासाठी चक्क काळी जादू केली जात आहे. काही इच्छुक उमेदवारांना तिकीट मिळू नये म्हणून त्यांची नावं कागदावर लिहीण्यात आली. शहरात  एक फोटो व्हायरल होत आहे. कागदाला लिंबू, अंगारा, कुंकू, लोखंड टोचण्यात आलं आहे. कोल्हापुरात महापालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू झालीय. त्यासाठी इच्छुक उमेदवारांची नावं एका कागदावर लिहीण्यात आली आणि त्याला लिंबू, अंगारा, काळा दोरा आणि लोखंड टोचण्यात आलं. रस्त्यावर हा कागद मिळाला. या इच्छुकांच्या विरोधात असलेल्यांनी हे काळं कृत्य केलं आहे.
 
कोल्हापूर शहरामधला आठवड्यातला हा दुसरा प्रकार आहे. काही दिवसांपूर्वी  कळंबा स्मशानभूमीमध्ये काही मुलांची नावं लिंबावर लिहून त्याला टाचण्या टोचण्यात आल्या होत्या.