सद्गुरु मुंबईत दिवसभराचा प्रगत-ध्यान कार्यक्रम आयोजित करणार
येत्या १४ डिसेंबर रोजी ईशा फाउंडेशन मुंबईत सद्गुरूंसोबत 'सोक इन एक्सटसी ऑफ एनलाइटनमेंट' हा एक पूर्ण दिवसाचा अनुभवात्मक प्रगत कार्यक्रम सादर करत आहे. हा कार्यक्रम सद्गुरूंसोबत उपस्थित राहण्याची एक दुर्मिळ संधी आहे ज्यात सहभाग घेणाऱ्या सर्व साधकांना शक्तिशाली प्रक्रिया व ध्यानांचा अनुभव ते करू इच्छितात. कार्यक्रमात सहभागी होणाऱ्यांना जागरूकतेच्या उच्च अवस्थांचा अनुभव घेता येईल आणि सद्गुरूंना ज्वलंत प्रश्न विचारण्याची संधी देखील मिळेल.
इंग्रजीमधून सादर होणाऱ्या ह्या कार्यक्रमाचे हिंदी आणि मराठीमध्ये थेट भाषांतर आयोजित केले जाईल. या प्रगत-स्तरीय कार्यक्रमासाठी शांभवी महामुद्रा क्रियासह इनर इंजिनिअरिंग कार्यक्रम आधी पूर्ण करणे आवश्यक आहे.
बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समधील जिओ वर्ल्ड सेंटर येथे रविवार दिनांक १४ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता हा कार्यक्रम सुरू होईल आणि संध्याकाळी ६:३० वाजता संपेल.
'आत्मज्ञानाच्या परमानंदात चिंब भिजून जा' हा केवळ एक कार्यक्रम किंवा समारंभ नसून सद्गुरुंच्या उपस्थितीत स्वतःच्या अंतरंगात आनंदाच्या शिखरावर पोहोचण्याची आणि अनामिक परमानंदाने वाहून जाण्याची ही एक प्रचंड संभावना आहे. सद्गुरुंच्या सांगतात हा केवळ एखादा ध्यान कार्यक्रम नाही तर चेतनेच्या उच्च अवस्थांकडे जाण्याचे हे एक प्रवेशद्वार आहे जेथून एखाद्याला उत्कट परमानंदाच्या क्षेत्राचा शोध घेता येणे शक्य होते, जिथे जीवनाचा सारांश आपल्या संपूर्ण वैभवशाली अवस्थेत प्रकट होतो.
हा कार्यक्रम सद्गुरू जगभरात आयोजित करत असलेल्या अनुभवात्मक कार्यक्रमांच्या मालिकेचा एक भाग आहे. या महिन्याच्या सुरुवातीला सॅन फ्रान्सिस्को आणि फिलाडेल्फिया येथेही असाच कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मुंबईत येण्यापूर्वी २२ नोव्हेंबर रोजी लंडनमध्ये सद्गगुरुंनी असाच एक कार्यक्रम आयोजित केला होता.