बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोलापूर , सोमवार, 1 मार्च 2021 (14:52 IST)

कोल्हापूर ते नागपूर द्वि-साप्ताहिक विशेष गाडी धावणार

मध्य रेल्वेने कोल्हापूर ते नागपूर ही विशेषगाडी 12 मार्चपासून आठवड्यातील दोन दिवस चालवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती रेल्वे विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
 
गाडी क्रमांक 01404 विशेष गाडी 12 मार्चपासून आठवड्यातील सोमवारी व शुक्रवारी छत्रपती शाहू महाराज टर्मनिस, कोल्हापूर स्थानकावरून दुपारी 12.45 वाजता सुटेल व नागपूर स्थानकावर दुसर्या दिवशी दुपारी 12 वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक 01403 ही विशेष गाडी 13 मार्चपासून आठवड्यातील मंगळवारी व शनिवारी नागपूर स्थानकावरून दुपारी 3.15 वाजता सुटेल आणि कोल्हापूर स्थानकावर दुसर्याग दिवशी दुपारी 2.00 वाजता पोहोचेल.
 
या गाडीस मिरज, सांगोला, पंढरपूर, कुर्डूवाडी, बार्शी टाऊन, उस्मानाबाद, लातूर, लातूर रोड, परळी वैजनाथ, परभणी, पूर्णा, हिंगोली डेक्कन, वाशिम, अकोला, मुर्तजापूर, बडनेरा, धामणगाव, पुलगाव, वर्धा आणि अजनी या स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.
 
ही गाडी आरक्षित असून या विशेष गाड्यांचे आरक्षण बुकिंग 1 मार्चपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www. irctc.co.in या संकेतस्थळावर उघडेल. या विशेष गाडीचा लाभ प्रवाशांनी घ्यावा, असे आवाहन मध्य रेल्वे सोलापूर विभागाचवतीने करण्यात आले आहे.