नागपूरमध्ये आज आणि उद्या लॉकडॉऊन

lockdown
Last Modified शनिवार, 27 फेब्रुवारी 2021 (16:40 IST)
कोरोना रूग्णांची संख्या कमी करण्यासाठी नागपुरात आज आणि उद्या (रविवार) दोन दिवस लॉकडॉऊन पाळण्यात येणार आहे. हे दोन दिवस प्रशासनाने कडक निर्बंध घातले आहेत. हे निर्बंध कडक असले तरी नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हितकारक आहे. त्यामुळे शनिवार आणि रविवार दोन्ही दिवस प्रतिष्ठाने, कार्यालये, दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय मागील आठवड्यातच घेण्यात आला होता.

नागपूर महानगरपालिकेच्या अधिकृत सोशल मीडियावरून महापौर आणि आयुक्तांनी नागरिकांना उद्देशून नियम पाळण्याचे आणि कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी स्वयंस्फूर्तीने प्रशासनाने घातलेले निर्बंध पाळून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे शनिवार आणि रविवारी कुणीही घराबाहेर निघू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. यानुसार शहरातील वैद्यकिय सेवा, वृत्तपत्र संदर्भातील सेवा, दुध विक्री व पुरवठा, भाजीपाला विक्री व पुरवठा, फळे विक्री व पुरवठा, पेट्रोल पंप, गॅस एजन्सी, बस सेवा, ऑटोरिक्षा, खासगी वाहतूक, बांधकामे, उद्योग, कारखाने, किराणा दुकान इत्यादी जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवा या दोन्ही दिवशी सुरू राहणार आहेत. तर, अत्यावश्यक सेवा वगळता कुठलीही दुकाने, मॉल, बाजार, थिएटर, नाट्यगृह, उपहारगृह, हॉटेल, रेस्टॉरेंट, सरकारी, निमशासकीय, खासगी कार्यालये, मनपाचे कत्तलखाने, शहरातील मांस विक्रीची दुकाने सुरू राहणार नाहीत. नागरिकांनीही अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये. कुटुंबासोबत दिवस घालवावा आणि कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


यावर अधिक वाचा :

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे ...

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे खासदार,' लोकांचा सवाल?
वाराणसी… हिंदूंसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या शहरांपैकी एक. मात्र, वाराणसी आणि ...

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल
देशातील कोरोना व्हायरस संकटाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची घराघरात पॅकिंग
सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता कोरोना टेस्टिंगसाठी वापरले जाणारे स्वॅब स्टिक घरात जमिनीवर ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा कमी
देशात कोरोनाने थैमान मांडला आहे. दररोज लाखो लोक याने संक्रमित होत आहे. अशात आपल्या ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय आहे ते जाणून घ्या
आयपीएल पुढे ढकलण्यात आल्यानंतरही न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनसह चार खेळाडू 10 ...

बारावी बोर्डाच्या परीक्षेबाबत अद्याप कोणताही निर्णय नाही ...

बारावी बोर्डाच्या परीक्षेबाबत अद्याप कोणताही निर्णय नाही -सीबीएसई
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) शुक्रवारी सांगितले की बारावी बोर्डाच्या ...

गोव्यात ऑक्सिजन पुरवठ्यावरुन गोंधळ, एका दिवसात 75 मृत्यूंची ...

गोव्यात ऑक्सिजन पुरवठ्यावरुन गोंधळ, एका दिवसात 75 मृत्यूंची नोंद
ऑक्सिजन आणि कोव्हिड रुग्ण व्यवस्थापनावरून गोव्यातला असंतोष वाढत असून ऑक्सिजन पुरवठा ही ...

कोविड काळात बजाज ऑटोचा मोठा निर्णय! २ वर्षांपर्यंत पगार, ...

कोविड काळात बजाज ऑटोचा मोठा निर्णय! २ वर्षांपर्यंत पगार, मुलांसाठी शिक्षण, ५ वर्षांचा आरोग्यविमा!
करोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये प्रादुर्भाव वाढू लागला असताना अनेक उद्योगपतींनी देखील या ...

करुणा धनंजय मुंडे उलगडणार प्रेमकथा; फेसबुक पोस्ट

करुणा धनंजय मुंडे उलगडणार प्रेमकथा; फेसबुक पोस्ट
राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या जोडीदार ...

मराठा आरक्षणाबाबत केंद्राच्या फेरविचार याचिकेत राज्याने ...

मराठा आरक्षणाबाबत केंद्राच्या फेरविचार याचिकेत राज्याने सहभागी व्हावे :महेश लांडगे
सर्वोच्च न्यायालयाच्या मराठा आरक्षणासंदर्भातील निकालानंतर महाविकास आघाडी सरकारने आपला ...