शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021 (08:37 IST)

पावन गडावर शिवकालीन तोफगोळ्यांचा मोठा साठा सापडला

पन्हाळा गडाजवळ असलेल्या पावन गडावर तोफगोळ्यांचा मोठा साठा सापडला. गडावर दिशादर्शक फलक लावण्याचे काम सुरू असताना तोफ गोळे सापडल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. तोफगोळे शिवकालीन असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
 
पन्हाळा गडाच्या शेजारी चार किमी अंतरावर पावनगड आहे. हा गड छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधला आहे. तो पन्हाळा गडाचा संरक्षक गड मानला जातो. रेडेघाट परिसरात तो असून वन विभागाच्या ताब्यात आहे. येथे वनविभाग आणि ‘टीम पावनगड’ या संघटनेच्यावतीने विकासकामे सुरू आहेत. त्या अंतर्गत महत्वाच्या ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्याचे काम सुरू आहे.
 
फलक लावण्यासाठी खड्डा खोदला जात असताना महादेव मंदिरा शेजारी तोफगोळ्यांचा साठा सापडला. त्याचे मोजमाप केले असता चारशेवर तोफगोळे असल्याचे आढळून आले.१०० ते २५० ग्राम वजनाचे तोफगोळे आहेत. ते एकावर एक असे रचून ठेवले होते. स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार या ठिकाणी दारूगोळ्याचे कोठार होते. या परिसरात आणखी तोफगोळे सापडण्याची शक्यता आहे. या भागात तोफगोळ्यांचा इतक्या मोठ्या प्रमाणात साठा सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे.