सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : गुरूवार, 17 डिसेंबर 2020 (13:13 IST)

शिवाजी महाराज आणि रामदास स्वामींचं शिल्प हटवा

शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांचं साताऱ्यातील शिल्प हटवावं अशी मागणी श्रीमंत कोकाटे यांनी साताऱ्यात पत्रकार परिषद घेऊन केली आहे.
 
याबाबतचे एक निवेदन जिल्हाधिकारी, नगरपालिका आणि बांधकाम विभागालाही देण्यात आलं आहे. शिल्प बसवण्यासाठी पालिकेची परवानगी नव्हती आणि अनधिकृतपणे ते उभारण्यात आलं आहे, असा आरोप कोकाटे यांनी केला आहे.
 
'भाजप इतिहासाचं विद्रुपीकरण करत आहे. या शिल्पाच्या बाबतीत सर्व पुरोगामी संघटना एकत्रित येतील.' असं पार्थ पोळके यावेळी म्हणाले आहेत.