बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 17 डिसेंबर 2020 (12:33 IST)

अजिंक्य रहाणे कसोटीत चांगल्या पद्धतीने नेतृत्व करेल – सचिन तेंडुलकर

भारतीय कसोटी संघाचा उप-कर्णधार अजिंक्य रहाणेवर ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मोठी जबाबदारी आहे. कर्णधार विराट कोहली पत्नी अनुष्काची काळजी घेण्यासाठी भारतात परतणार आहे. विराटच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणे भारताचं नेतृत्व करेल. 
 
माजी फलंदाज सचिन तेंडुलकरच्या मते अजिंक्य रहाणे चतूर आहे, त्यामुळे तो भारताचं चांगल्या पद्धतीने नेतृत्व करेल. “विराटच्या अनुपस्थितीत अजिंक्य भारताचं नेतृत्व करताना पाहणं मनोरंजक ठरेल. तो अतिशय संतुलित आहे. त्याच्यातील आक्रमकता कुठे दाखवायची हे त्याला माहिती आहे. तो मेहनती असून कोणतीही गोष्ट गृहीत धरत नाही. अजिंक्य विराटच्या अनुपस्थितीत भारताचं चांगल्या पद्धतीने नेतृत्व करेल अशी खात्री सचिनने एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत बोलून दाखवली.