गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 3 डिसेंबर 2020 (13:02 IST)

फिंचचा खुलासा, भारताविरुद्ध तिसऱ्या वनडेत मिशेल स्टार्क का खेळला नाही

ODI between Australia and India
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बुधवारी कॅनबेरा येथे तिसरा वनडे सामना खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क खेळला नाही. त्याचा प्लेयिंग इलेव्हनमध्ये समावेश का केला नाही हा प्रश्न पडला असताना ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंचने खुलासा केला की स्टार्कच्या कंबरेला आणि रिबला किरकोळ दुखापत झाल्यामुळे त्याला विश्रांतीची गरज होती.
 
पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये स्टार्क प्रभावी नव्हता कारण त्याने दोन्ही सामन्यात एकूण 18 षटके फेकली त्यामध्ये त्याने तब्बल 147 धावा दिल्या आणि फक्त एक गडी बाद केला.