मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , मंगळवार, 24 नोव्हेंबर 2020 (13:56 IST)

कोरोनातही बीसीसीआय मालामाल

भारतात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बीसीसीआयने आयपीएलच्या तेराव्या हंगामाचे आयोजन युएईत केले. 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या काळात झालेल्या या स्पर्धेच्या आयोजनातून बीसीसीआयही मालामाल झाली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून बीसीसीआयने तब्बल 4 हजार कोटी रूपयांची कमाई केली आहे. बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमाळ यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. कमाईच्या बाबतीतच्या बीसीसीआय  मालामाल झाले नसून गेल्या हंगामाच्या तुलनेत आयपीएलचे सामने टीव्हीवर पाहणार्या प्रेक्षकसंख्येतही 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
 
धुमाळ यांनी बीसीसीआयने कमावलेल्या 4 हजार कोटींचे वर्गीकरण करुन सांगायला नकार दिला. दुबई, अबुधाबी आणि शारजा या तीन मैदानांवर आयपीएलचे सामने रंगले. स्पर्धेला सुरुवात होण्याआधी टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिचला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर अनेकांनी आम्हाला आयपीएलचे आयोजन करु नका असा सल्ला दिला. आमच्यातही थोडे संभ्राचे वातावरण होते. खेळाडूंना काही झाले तर काय करायचे ही भीतीमनात होती. परंतु जय शहा हे ठाम होते आणि स्पर्धा यशस्वीरीच्या पार पडली जाईल असा त्यांना विश्वास होता.
 
मेल आयपीएल हंगामाच्या तुलनेत बोर्डाने आपले खर्च 35 टक्क्यांनी कमी केले. या  काळातही आम्ही 4 हजार कोटींची कमाई केली. मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सलामीच्या सामन्याला प्रेक्षकांनी दिलेला प्रतिसाद हा अभूतपूर्व होता. जे सुरुवातीला आमच्यावर शंका घेत होते, त्यांनी नंतर येऊन आमचे आभार मानले. यंदाची स्पर्धा झाली नसती तर क्रिकेटपटूंनी एक वर्ष गमावले असते असेही धुमाळ म्हणाले.
 
यूएई व श्रीलंका अशा दोन क्रिकेट बोर्डांनी बीसीसीआयला आयपीएल आयोजिण्याचा प्रस्ताव दिला होता. परंतु याआधी यूएईने आयपीएलच्या  काही सामन्यांचे आयोजन केले होते. ज्यामुळे बीसीसीआयने यूएईला पसंती दिली. खेळाडूंच्या सुरक्षिततेपासून ते जैव सुरक्षित वातावरण तयार करण्यापर्यंत बीसीसीआयच्या अधिकार्यांनी सातत्याने फोन, व्हर्चुअल मिटिंग करत या सर्व गोष्टी जुळवून आणल्या. स्पर्धेच्या आयोजनासाठी सर्व बाबतीत मदत केलेल्या यूएई क्रिकेट बोर्डाचेही धुमाळ यांनी आभार मानले.