बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 24 नोव्हेंबर 2020 (08:34 IST)

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन पुढे ढकलण्याची शक्यता

संसदेचे हिवाळी अधिवेशन पुढे गेल्यानंतर राज्यातील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनही पुढे ढकलण्याची शक्यता आहे. ७ डिसेंबरपासून राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे. मात्र राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने हिवाळी अधिवेशन डिसेंबरऐवजी जानेवारीपर्यंत पुढे ढकलले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 
कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत याबाबत निर्णय होणार आहे. पुढील आठवड्यात कामकाज सल्लागार समितीची बैठक होण्याची शक्यता आहे. हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईतच होणार आहे. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता.