शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 12 नोव्हेंबर 2020 (16:58 IST)

भारत मार्च आणि जूनमध्ये खेळेल FIFA WC क्वालिफायरचे मॅच

भारतीय फुटबॉल संघ पुढच्या वर्षी मार्च आणि जूनमध्ये कोविड -19 साथीच्या रोगामुळे स्थगित 2022 फिफा विश्वचषक आणि 2023  एशियन चषक पात्रता फेरी खेळणार आहे. एशियन फुटबॉल कन्फेडरेशनच्या कॉन्टिनेन्टल स्पर्धा समितीने (एएफसी) बुधवारी याबाबत निर्णय घेतला. समितीने मात्र तारखांची घोषणा केली नाही. फिफा आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या दिनदर्शिकेनुसार 2021 ची पहिली विंडो 22 ते 30 मार्च दरम्यान आहे तर एएफसीची दुसरी विंडो 31 मे ते 15 जून दरम्यान आहे.