बुधवार, 1 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2020
Written By
Last Modified: सोमवार, 2 नोव्हेंबर 2020 (08:04 IST)

राजस्थान आयपीएलमधून बाहेर तसेच केकेआर विजयासह टॉप 4 मध्ये

ipl-2020
रविवारी खेळल्या गेलेल्या आयपीएलच्या IPL सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने राजस्थान रॉयल्सचा 60 धावांनी पराभव केला आहे. इयन मॉर्गनच्या नाबाद 68 धावांच्या जोरावर कोलकाताने 20 ओव्हरमध्ये 7 गडी गमावून 191 धावा केल्या होत्या. राजस्थानला 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 131 धावाच करता आल्या. राजस्थानकडून जोस बटलरने सर्वाधिक 35 धावा केल्या. राहुल तेवतियाने 31 आणि श्रेयस गोपालने नाबाद 23 धावा केल्या. मॉर्गनने 35 बॉलमध्ये 5 फोर आमि 6 सिक्स मारले. राहुल त्रिपाठीने 39 धावा केल्या. शुभमन गिलने 36 धावा केल्या. आंद्रे रसेलने 25 धावा केल्या. राहुल तेवतियाने तीन विकेट घेतल्या.
 
कोलकातानाइट रायडर्सने Kolkata Knight Riders धमाकेदार विजयासह टॉप-4 मध्ये जागा मिळवली आहे. राजस्थान टीम या पराभवानंतर सर्वात शेवटच्या स्थानावर गेली आहे. तसेच आयपीएलमधील त्यांचं आव्हान देखील संपुष्टात आलं आहे. कर्णधार इयॉन मॉर्गन आणि पॅट कमिंसचं आजच्या सामन्यात मोठं योगदान होतं.
 
राजस्थानने टॉस जिंकल्यानंतर आधी बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला होता. कोलकाताकडून कमिंसने 4 विकेट घेतले तर वरुण चक्रवर्ती आणि शिवम मावीने दोन-दोन विकेट घेतल्या.