शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: बुधवार, 28 ऑक्टोबर 2020 (10:11 IST)

ज्योतिष संबंधी महत्त्वाच्या 4 गोष्टी

ज्योतिष एक महान शास्त्र आहे. कोणताही पंडित पूर्णपणे ज्ञानी नसतो पण शास्त्रात आपल्याला अश्या काही गोष्टी आढळतात ज्या आश्चर्यात टाकतात.

आज आम्ही आपल्यासाठी अश्याच काही निवडक आणि आवश्यक गोष्टी आणल्या आहेत. जाणून घेऊ या काय आहेत त्या.
 
1 गुरु ग्रहाची कृपा असल्यावर अमृताचा वर्षावच होतो. या संदर्भात हे ठरवणे फार गरजेचं आहे की गुरु हे लग्न त्रिकोणाचे स्वामी आहे की तिहेरी स्थळांचे स्वामी आहेत. अष्टमेश किंवा मार्केश असल्याची चौकशी देखील करावयास पाहिजे. गुरु लग्नेश त्रिकोणी असल्यावरच त्यांची दृष्टी अमृताचा वर्षाव करणारी असेल नाही तर नाही.
 
2 शनीच्या संदर्भात अशी आख्यायिका आहे की शनी ज्या स्थळावर बसतात त्या स्थळाची वृद्धी करतात आणि ज्या स्थळाला बघतात त्या स्थळाचा बिगाड करतात. शनी कुंडलीत कारक असल्यास ज्या स्थळी बसतात त्या स्थळाची वृद्धी करतात आणि ज्या स्थळी बघतात त्यावर आपला शुभ परिणाम देतात. म्हणूनच मान्यतेच्या संदर्भात नेहमीच एकच दृष्टिकोन अवलंबू नये.
 
3 हातात शनी पर्वत दबलेला असल्यास आणि त्याचे बोट सूर्याच्या बोटाकडे वाकलेले असल्यास जीवनात शनीचा अडथळा दिसून येतो.
 
4 मंगळ हा उत्साह आणि आनंद मिळविण्यासाठी प्रवृत्त करणारा ग्रह आहे. याचा स्वभाव लढाऊ आहे. मंगळ ग्रहाच्या स्वभावामुळे मंगळ दोषाचा विचार करतात. कारण अधिक उत्साह आणि आनंद मिळविण्याची प्रबळ इच्छा वैवाहिक जीवनासाठी घातक असू शकते.