काय सांगता, आदिशक्ति मां जगदम्बे देवी पार्वती नव्हे?
आपणास हे तर माहीतच असणारं की देवी सरस्वती आणि देवी लक्ष्मी या दुर्गा देवी पासून वेगळ्या आहेत, पण आता मनात असा प्रश्न उद्भवतो की देवी पार्वती देखील दुर्गा किंवा अंबेमाता आहे का?
काली, तारा, छिन्नमस्ता, षोडशी, भुवनेश्वरी, त्रिपुरभैरवी, धूमावती, बगलामुखी, मातंगी आणि कमला या सर्व एकच आहेत का?
शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायिनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धीदात्री या सर्व माता एकच आहे का?
आपल्या हिंदू धर्मात शेकडो देवी-देव आहेत. त्यापैकी तर काही प्रजापतींच्या मुली आहेत, तर काही स्वयंभू आहे आणि काही इतर देवांच्या बायका आहेत.
शिवपुराणानुसार अविनाशी परब्रह्माने यांनी काही काळानंतर दुसऱ्याची इच्छा व्यक्त केली. त्यांच्यातून एकापेक्षा अनेक होण्याचा संकल्प उद्भवला. मग त्या निराकार शक्तीने आपल्या लीलेने एका आकाराची कल्पना केली, जी मूर्तीहीन परब्रह्म आहेत. परम ब्रह्म म्हणजे एकाक्षर ब्रह्म. परम अक्षर ब्रह्म, ते परम ब्रह्म म्हणजे खुद्द भगवान सदाशिव आहे. एकटे राहणारे आपल्या इच्छेने सर्वत्र फिरणारे सदाशिवने आपल्या शरीरापासून सृष्टीचं निर्माण केलं. जी कधीही त्यांचा पासून वेगळी होणारी नसे. सदाशिवाच्या त्या सामर्थ्याला प्रबळ प्रकृति, योगमाया, बुद्धिमत्ता घटकाची आई आणि विकार रहित असे म्हटले जाते.
तीच शक्ती अंबिका (पार्वती किंवा सती नव्हे) म्हटली गेली आहे. तिला प्रकृती, सर्वेश्वरी, त्रिदेव माता (ब्रह्मा,विष्णू,महेश) यांची आई आणि नित्य आणि मूळ कारण देखील म्हणतात. सदाशिवाने प्रकट केलेल्या त्या शक्तीला आठ हात आहे.
परशक्ती जगतजननी ती देवी अनेक गतीने समृद्ध आहे आणि अनेक प्रकारच्या शस्त्र शक्ती वापरते. एकांकीनी असली तरीही ती मायाशक्तीने संयोगवशात अनेक होते. त्या काळरूपी सदाशिवाची अर्धांगिणीलाच अंबा जगदंबा म्हणतात.