1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. नवरात्रौत्सव
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2020 (11:54 IST)

नवरात्र विशेष : नवमीला या उपायाने नशीब चमकवणार

Navami upay in Navratri
नवरात्री हे त्वरित फळ देणारे असे उत्सव आहे. जर एखाद्या माणसाने आपल्या महाविद्याच्या मंत्रांना आपल्या शुद्ध आणि गुप्त उद्दिष्टये किंवा इच्छांच्या प्राप्तीसाठी खऱ्या मनाने जाप केल्यानं त्यांच्या सर्व इच्छा लवकर पूर्ण होतात.
 
* नवरात्रीचा सुप्रसिद्ध उपाय आहे की आई दुर्गा आणि सर्व महाविद्यांचे स्मरण करुन एक स्वच्छ, नवीन साजसज्जा केलेलं मातीचे घट घ्या. त्यामध्ये सप्त धान्याचे दाणे, 1 रुपयाचे किंवा चांदीचे नाणे ठेवा. गंगेचे मिश्रित पाणी यामध्ये भरा. घटात एक- एक सुपारी, पूजेचं बदाम आणि हळकुंड घाला. आता या पाण्यात किंचित कुंकू, अबीर आणि तांदूळ शिंपडा. आता यावर दिवा झाकावा. या दिव्यावर एक नारळ ठेवा. नारळावर नाडी (मौली) बांधा आणि या घटाची योग्यरितीने पूजा करावी.
 
* इच्छापूर्ती कलश किंवा घट - 
कलशाच्या किंवा घटाच्या समोर हात जोडून, डोळे बंद करून दररोज देवी आई आणि महाविद्यांना स्मरण करावं आणि आपल्या सर्व इच्छा देवी आई समोर सांगाव्या. पूजेतून उठताना आसनाला नमस्कार करूनच आसन उचलावं. असे नवरात्रीत दर रोज करावं. दररोज शक्य होत नसल्यास नवमीच्या दिवशी आवर्जून करावं. त्या कलशातील किंवा घट मधील पाणी स्वतःवर आणि पूर्ण घरावर शिंपडावे. उरलेले पाणी तुळस, पिंपळ किंवा एखाद्या पवित्र झाडाला घालावं. जर शक्य असल्यास हे पाणी नदी किंवा चांगल्या तलावामध्ये देखील वाहू शकता. कलशातील पूजेच्या साहित्यामधील नाणं काढून आपल्या जवळ ठेवा आणि उरलेलं साहित्य विसर्जित करा.
 
कलश उचलण्यापूर्वी शेवटच्या दिवशी 108 वेळा आपली इच्छा सांगा. नवरात्रीसाठी हे अचूक उपाय आहे.