शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. नवरात्रौत्सव
Written By
Last Modified: शनिवार, 17 ऑक्टोबर 2020 (08:51 IST)

शारदीय नवरात्र : या नवरात्रात हे विशेष उपाय करून बघा, नक्कीच फायदा होणार

नवरात्र हे हिंदूंचा मुख्य सण आहे. यंदाच्या वर्षी 17 ऑक्टोबर पासून सुरु होऊन 25 ऑक्टोबर पर्यंत 9 दिवस चालणाऱ्या या पवित्र अश्या सणाला आई दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. देवी आईचा आशीर्वाद मिळवण्यासाठी भाविक नऊ दिवसाचे उपवास धरतात. धार्मिक मान्यतेनुसार या नऊ दिवसात वास्तूच्या सोप्या पद्धती अवलंबविल्या तर इच्छित फळाची प्राप्ती होते. चला तर मग जाणून घेऊया की नवरात्राच्या या नऊ रात्री मध्ये आपण कश्या प्रकारे वास्तूंचे उपाय करून आपल्या घरात सौख्य, भरभराट आणि शांती नांदवू शकता. 
 
* सर्वप्रथम देवी आईच्या स्वागतापूर्वी घराची स्वच्छता करावी. आपल्या घरातून अडगळीचं सामान जसे की जुने चपला-जोडे बाहेर टाकावे. घाण आणि कचरा साठवू नये. धुपाची कांडी आणि दिव्याने वातावरणाला सुंदर बनवा. पूजा स्थळभोवती घाण करू नये.
 
* या गोष्टीची काळजी घ्यावी की मंदिराचा झेंडा उत्तर-पश्चिम दिशेस लावावा. देवीआईची मूर्ती दक्षिणमुखी असावी, पण देवघराचे नियम मंदिरापेक्षा वेगळे असतात म्हणून घरात पूजा नेहमी पूर्वी मुखी होऊन करावी.  
 
* नवरात्रात देवी आईची पूजा करण्यासाठी देवी आईच्या मूर्तीस उत्तर-पूर्व दिशेला ठेवावं. अखंड दिवा दक्षिण-पूर्वी दिशेला लावावा. पूजेमध्ये स्थापित केला जाणाऱ्या घटाला लाकडाच्या पाटावर ठेवा. पूजेच्या पूर्वी हळद आणि कुंकुने स्वस्तिक बनवा. असे केल्यानं पूजेच्या स्थळी सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो.
 
* ज्या स्थळी देवी भगवतीची पूजा होणार आहे त्या ठिकाणी साज-सज्जा करायला पाहिजे आणि साज-सज्जा करताना काही गोष्टी लक्षात असू द्यावा. साज सज्जा करताना रंगाची निवड व्यवस्थितरीत्या करावी. इथे पांढरा, फिकट पिवळा, हिरवा रंग द्यावा. देवी आईच्या पूजेच्या वेळी लाल रंगाची ताजे फुले वापरा.