शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. नवरात्रौत्सव
Written By
Last Modified: बुधवार, 21 ऑक्टोबर 2020 (13:34 IST)

फक्त 5 रुपयांनी प्रसन्न होऊ शकते देवी, घेऊन या हे साहित्य

यंदाच्या नवरात्राला आपण देवी आईला सोप्या आणि स्वस्त उपायांनी आनंदी करू शकता. चला तर मग जाणून घेऊ या, कोणते आहेत ते स्वस्त उपाय ? 
 
* पानं - (नागलीची) ताजे पान आणून त्यावर एक रुपयांचे नाणे ठेवून आई भवानीच्या समोर ठेवावी.
 
* सुपारी - 5 रुपयांची पूजेची सुपारी आणून देवी आईला अर्पण केल्यास तर ती आनंदी होऊन आपल्याला आशीर्वाद देणार.

* कापूस - 5 रुपयांचे कापूस आणून देवी आईला अर्पण करावं असे केल्यास त्या तेवढ्याच आनंदी होणार जेवढ्या एखाद्या महागड्या पौराणिक उपायांनी होतात.
 
* गूळ - जर आपण महागडे नैवेद्य/भोग देवी आईला देऊ शकतं नसाल तर 5 रुपयाचा गूळ आणून पूर्ण भक्तिभावाने देवीआईच्या समोर ठेवावं. आपल्याला शुभाशीर्वाद नक्कीच मिळणार.
 
* काळे उकडलेले हरभरे - देवी आईला प्रसन्न करण्यासाठी हे सर्वात सोपे आणि स्वस्त उपाय आहे. 5 रुपयांचे काळे उकडलेले हरभरे देखील देवी आईला प्रसन्न करणार.
 
* खडी साखर - हे गोड नैवेद्य देवी आई प्रेमानं स्वीकारते.
 
* झेंडा - नवरात्रात लाल रंगाचा लहान झेंडा देवी आई ला अर्पण करून देवी आईला आनंदी करू शकता.
 
* मेंदी - कुंकू - मेंदीच लहान पाकीट कुंकूसह ठेवल्यानं देवी आईचा आशीर्वाद मिळतो.
 
* लवंग -वेलची - 5 रुपयाची लवंग आणि वेलची अर्पण केल्यानं देवी आई प्रसन्न होते.
 
* दूध- मध - एका छोटया वाटीत थोडंसं दूध आणि थेंब भर मध देखील देवी आईला प्रसन्न करतं.