लॉस एंजलिस संघ शाहरुखने घेतला विकत
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आता हॉलिवूडही गाजवाला तयार झाला आहे. परंतु यंदा तो चित्रपटातून आपल्या समोर येणशर नसून, अमेरिकेत आयपीएलच्या धर्तीवर होणार्या टी-20 स्पर्धेसाठी त्याने लॉस एंजलिस संघाची मालकी स्वीकारली आहे.
शाहरुखने आपल्या संघाचे नाव एल ए नाईट रायडर्स असे ठेवले आहे. या स्पर्धेत सहा संघ सहभागी होणार आहेत. अमेरिकेत येत्या काळात ही टी-20 स्पर्धा भरवली जाणार असून या स्पर्धेत न्यूयॉर्क, सॅन फ्रॉन्सिस्को, वॉशिंग्टन डी. सी, शिकागो, डल्लास आणि लॉस एंजलिस असे सहा संघ सहभागी होणार आहेत. अमेरिकेत टी-20 क्रिकेटचे
आयोजन करणार्या अमेरिकन क्रिकेट एन्टरप्राइस या कंपनीमध्ये शाहरुखच्या फर्मची भागीदारी आहे. या संस्थेने अमेरिकन क्रिकेट बोर्डाकडून टी-20 स्पर्धेच्या आयोजनाची परवानगी घेतली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या स्पर्धेसाठी शाहरुखने इंडियन एक्स्लूविसीलिटी या अंतर्गत लॉस एंजलिस संघाची मालकी घेतली आहे. ज्यामुळे इतर कोणाताही भारतीय संघ किमान 5 वर्ष या स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही. 2022 साली आयपीएलनंतर लगेचच ही स्पर्धा होईल.