सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: लंडन , गुरूवार, 19 नोव्हेंबर 2020 (14:58 IST)

ऑस्ट्रेलियानंतर भारतीय संघ जाणार इंग्लंडच्या दौर्यांवर

ऑस्ट्रेलिया दौर्यानंतर भारतीय संघ इंग्लंडला जाणार आहे. इंग्लंडच्या क्रिकेट मंडळाने भारताविरुद्धच्या कसोटी मालिकांचे वेळापत्रक बुधवारी जाहीर केले आहे. भारतीय संघ पुढील वर्षी इंग्लंडमध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेची सुरूवात ट्रेंट ब्रिज येथून होईल. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना 4 ते 8 ऑगस्ट या कालावधीमध्ये ट्रेंट ब्रिज येथे होणार आहे. यानंतर दुसरा कसोटी सामना 12 ते 16 ऑगस्ट या कालावधीमध्ये क्रिकेटची पंढरी समजली जाणार्या लॉड्‌र्सवर होणार आहे. 
 
हेडिंग्लेच्या मैदानात तिसरा कसोटी सामना 25 ते 29 ऑगस्ट यादरम्यान खेळवला जाणार आहे. चौथा कसोटी सामना 2 ते 6 सप्टेंबर या कालावधीमध्ये ओव्हल या मैदानात तर अखेरचा आणि पाचवा कसोटीक्रिकेट सामना 10 ते 14 सप्टेंबर या दरम्यान ओल्ड ट्रॅफर्ड या मैदानात होणार आहे. आतापर्यंत इंग्लंडच्या क्रिकेट मंडळाने या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले आहे.