रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: मेलबर्न , शनिवार, 6 जून 2020 (11:35 IST)

आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी ऑस्ट्रेलियाकडून पंचांच्या संख्येत कपात

कोरोना महामारीमुळे झालेले आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (सीए) शुक्रवारी कपातीच्या दिशेने पाऊल टाकले असून आगामी हंगामासाठी 12 सदस्यीय राष्ट्रीय पॅनलमधील निवृत्त झालेले पंच सायमन फ्राई आणि जॉन वार्ड यांच्या जागा रिक्त ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सायमन आणि जॉन हे यावर्षीच्या सुरूवातीलाच निवृत्त झाले होते. 
 
सीए त्या पंचांच्या जागी कोणालाही नेमू इच्छित नाही. याचा अर्थ असा आहे की, पंचांचे पॅनल कमी  होऊन आता ते 10 एव्हढेच होणार आहे. याचा अर्थ असा आहे की, या पंचांना मागील सत्रापेक्षा जास्त सामन्यांमध्ये पंचांचे काम करावे लागणार आहे. एप्रिलमध्ये वरिष्ठ पंचांना खर्च कमी करण्याचे उपाय शोधण्यास सांगणत आले होते. तसेच या पंचांनी आपल्या करारपत्रात बदल करण्यास सहमती दर्शवली होती. त्यामुळे सीएचे क्रिकेट परिचालन प्रमुख पीटर रोच यांनी पंचांचे आभार मानले आहेत.