सोमवार, 30 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 16 डिसेंबर 2020 (15:22 IST)

युवराज सिंहचे क्रिकेटमध्ये पुनरागन

भारताच्या दोन विश्वचषक विजयात मोलाचा वाटा उचलणारा दिग्गज अष्टपैलू युवराज सिंह निवृत्तीनंतर पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे. सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफीसाठी पंजाबच्या संभाव्य खेळाडूंच्या यादीत युवराजचाही समावेश करण्यात आला आहे. देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेसाठी पंजाबने मंगळवारी संभाव्य 30 खेळाडूंची नावे जाहीर केली. 
 
युवराजने मागील वर्षी जूनमध्ये क्रिकेटला अलविदा केला होता. मात्र पंजाब क्रिकेट संघाचे सचिव पुनीत बाली यांच्या विनंतीनंतर तो आपल्या राज्याकडून खेळण्यासाठी तयार झाला आहे. तो मोहालीच्या आएस बिंद्रा स्टेडियमवर सध्या सराव करत आहे. त्याने सोशल मीडियावर आपल्या सरावाचा व्हिडिओही पोस्ट केला आहे.