गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. नवरात्रौत्सव
Written By
Last Updated : शुक्रवार, 30 सप्टेंबर 2022 (09:47 IST)

छत्रपतींचे कुलदैवत तुळजापूरची श्री तुळजाभवानी

Tuljabhavani temple
तुळजापुरातील तुळजाभवानीचे तीर्थक्षेत्र हे पूर्ण आणि आद्यपीठ मानले जाते. इथे तुळजाभवानीचे प्राचीन देऊळ असून हे महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यात वसलेले आहे. पुराणानुसार असुरांचा संहारकरून धर्माचरण आणि नीतीची पुनर्स्थापना करण्याचे कार्य देवी आईने केले आहे.
 
स्वराज्य हिंदवीचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज भोसले यांची कुलदेवी देखील हीच तुळजाभवानी आहे. भवानीआईच्या आशीर्वादाने महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा मिळाली असून खुद्द देवी आईने छत्रपती शिवाजी महाराजांना दृष्टांत देऊन महाराष्ट्रावरील आलेल्या संकटाचे निवारण करण्यासाठी तलवार दिली होती. 
 
या संदर्भात अशी आख्यायिका आहे की देवीचे हे देऊळ डोंगरमाथ्यावर असल्याने याचा कळस दिसत नाही. या देऊळाचे काही भाग हेमाडपंतीने बांधले आहे. नवरात्रोत्सव जरी नऊ दिवसाचा असला तरी हा उत्सव इथे एकूण एकवीस दिवस चालतो.
 
तुळजापूर हे महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यातील तीर्थ क्षेत्र जे समुद्र तळापासून 270 मीटर उंची वर असलेल्या बालाघाटच्या डोंगराच्या रांगेत हे ठिकाण असे.
 
महाराज श्रीमंत शिवाजीराजे भोसले यांची कुलदेवी असे. तुळजापूरची मराठ्यांच्या कारकिर्दीत भरभराट झाली. छत्रपती शिवाजी महाराज तर भवानी मातेच्या आशीर्वाद घेतल्याशिवाय मोहिमेवर निघतच नव्हते. पूर्वी या देऊळात सर्वत्र चिंचेची झाडे असल्यामुळे या परिसराचे नाव चिंचपूर असे. नंतर आई तुळजा भवानीच्या वास्तव्यामुळे त्याचे नाव तुळजापूर असे झाले.
 
या संदर्भात एक आख्यायिका आहे की कृतयुगात कर्दभ नावाचे तपोनिष्ठ ऋषी होऊन गेले. त्यांची पत्नी अनूभुती रुपसंपन्न असून पतिव्रता होती. सुदैवाने तिला पुत्ररत्न प्राप्त झाले.परंतु त्यांचा सुखी संसार फार काळ टिकला नाही. कारण कर्दभ ऋषींनी लवकरच इह्लोकीची यात्रा संपविल्यामुळे अनुभुतिने सती जाण्याचा निर्णय घेतला; परंतु अल्पवयीन पुत्राला मागे सोडून पतिसोबत सहगमन करू नये असे ऋषींनी शास्त्राचा आधार घेऊन सांगितले असता अनुभूतीने आपल्या पुत्राला गुरुगृही सोडून ती मेरू पर्वतानजिक असलेल्या मंदाकिनी नदीच्या परिसरात गेली. आणि तिथे आश्रम बांधून तिने तपश्चर्या सुरू केली. 

तिची तपश्चर्या सुरू असताना कुकर नावाचा दैत्य तिच्या अप्रतिम सौंदर्यावर लूब्ध झाला. त्याच्या मनात पापवासना निर्माण होऊन त्याने तिला स्पर्श केला त्यामुळे तिची समाधी भंग पावली. दैत्याने काही अनुचित प्रकार करु नये म्हणून तिने आदिशक्तिचा धावा केला. यासाठी की शक्तीने या दैत्याच्या तावडीतून आपली सुट्का करावी आणि खरोखरच देवी भवानी मातेच्या रुपाने त्वरित धावून आली. तिने दैत्याशी युदध केले. दैत्यही महिषाचे रूप घेऊन आला. तेव्हा देविने त्रिशुळाने त्याचे शीर वेगळे केले.ही भवानी देवी वेळीच अनुभूतीच्या रक्षणासाठी त्वरित धावून आल्यामुळे तिला त्वरिता असे नाव पडले. कालांतराने त्वरिताचे-तुरजा व त्याचे पुढे तुळजा झाले. ही तुळजा भवानीची मूर्ती स्वयंभू असून आई तुळजा भवानीला आठ हात आहेत.
 
तुळजापूरच्या जवळ पंढरपूर आणि अक्कलकोट हे महाराष्ट्रातील दोन मुख्य तीर्थक्षेत्र आहेत. आई तुळजा भवानीच्या देऊळात दररोज पहाटे चार वाजता चोघड्यानी पूजेला सुरुवात केली जाते. दरवर्षी चैत्र महिन्यात पौर्णिमेस चैत्र पौर्णिमा उत्सव साजरा केला जातो. पौर्णिमेच्या लख्ख पांढऱ्या शुभ्र प्रकाशात भाविक येथे भेट देतात. विजापूरची शाकंभरी देवीच्या सन्मानासाठी इथे पौष महिन्यात शाकंभरी नवरात्रोत्सव साजरा करण्यात येतो. देऊळात दरवर्षी अश्विन महिन्यातील शारदीय नवरात्र उत्सव देखील मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. 
 
तुळजा भवानीच्या देऊळाचे व्यवस्थापनाची जवाबदारी मंदिर न्यास सांभाळते. देऊळाच्या आवारात न्यासाचे कार्यालय आहे. भाविकांच्या राहण्याची आणि जेवण्याची सर्व व्यवस्था न्यासा मार्फत करण्यात येते. 
 
देऊळात प्रवेशासाठी राजा शहाजी आणि राजमाता जिजाऊ यांच्या नावे दोन द्वार आहेत. मुख्य द्वाराच्या पहिल्या मजल्यावर श्री संत ज्ञानेश्वर आणि श्री संत तुकाराम यांचे धार्मिक ग्रंथालय आहे. त्याचजवळ श्री समर्थ हे विश्राम गृह आहे. 
 
या देऊळात नारळ फोडण्यास मनाही आहे. महत्वाचे म्हणजे की या देऊळात छायाचित्र घेण्याची परवानगी नाही. या देऊळात पायऱ्या उतरल्यावर उजव्या हाताकडे गोमुख तीर्थ आहे. आणि डाव्या हाताला कल्लोळ तीर्थ दिसत. भाविक आई भवानीचे दर्शन करण्यापूर्वी या पवित्र तीर्थकुंडात स्नान करतात. या देऊळाच्या आवारात अमृत कुंड आणि दूध देऊळ आहे. मुख्य प्रवेश द्वाराच्या डाव्या हाताला सिद्धिविनायकाचे देऊळ आहे. तर उजवा बाजूस आदिशक्ती, आदिमाता मातंगीदेवीचे देऊळ आहे. त्या शिवाय आई अन्नपूर्णेचे देऊळ आहे. मुख्य प्रवेश द्वारेतून प्रवेश केल्यावर उजव्या बाजूस मार्कंडेय ऋषींचे देऊळ आहे. पायऱ्या उतरून खाली गेल्यावर आई तुळजा भवानीचे देऊळ आहे. या देऊळाच्या समोरच यज्ञकुंड आहे.
 
जाण्याचा मार्ग
सोलापूर आणि उस्मानाबाद वरून तुळजापूरला जाण्यासाठी नियमित बस आहे. सोलापुरवरून जवळपास चाळीस किलोमीटर च्या अंतरावर तुळजापूर आहे. उस्मानाबाद वरून येथील अंतर 16 किलोमीटर आहे.सोलापूर रेल्वे स्टेशन जवळ आहे. विमानाने जायचे असल्यास पुणे किंवा हैद्राबाद वरून तुळजापूरला यावे लागणार.