संभाजीराजेंना प्रवेश नाकारल्याप्रकरणी आज 'तुळजापूर बंद'ची हाक
उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावेळी भाजपचे खासदार संभाजीराजे यांना कुलस्वामामिनी तुळजाभवानी मंदिरात असताना गाभाऱ्यात जाण्यापासून रोखण्यात आल्याचा प्रकार सोमवारी (9 मे) घडला.
छत्रपती संभाजीराजे यांना तुळजापूर मंदिर संस्थानकडून गाभाऱ्यात दर्शन देण्यासाठी अडवल्याने तुळजापूरकर संतप्त आहेत. अशातच आता या प्रकाराविरोधात गुरुवारी (12 मे) तुळजापूरात बंदची हाक देण्यात आली आहे. सकल मराठा समाजाकडून ही बंदची हाक देण्यात आली आहे.
सकल मराठा समाज आणि तुळजापूरकरांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच याप्रकरणी जिल्हाधिकारी, मंदिर तहसीलदार आणि व्यवस्थापक यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.
तुळजाभवानी मंदिर आणि छत्रपती संभाजीराजे यांच्या घराण्याचं विशेष नातं राहिलं आहे. मात्र पुरातत्व विभागाच्या एका निर्णयामुळे त्यांना मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्यापासून थांबण्यात आल्याचं बोललं जात आहे.