रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 11 मे 2022 (21:46 IST)

नाशिकमध्ये दोन अपघात, पाच ठार

नाशिकमध्ये दोन अपघात झाले असून त्यात पाच जणांनी जीव गमावला आहे. पहिला अपघात मनमाडजवळ पुणे-इंदोर महामार्गावरअपघात झाला. झाडावर कार आदळून झालेल्या या अपघातात कारमधून प्रवास करणाऱ्या चौघा मित्रांचा जागीच मृत्यू झाला. तर पाचवा मित्र गंभीर जखमी झाला आहे.  त्याला उपचारासाठी मनमाडच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 
या घटनेत पाचही मित्र कार्यक्रमासाठी येवल्याकडे गेले होते. परत येताना चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळली.  कारने झाडाला दिलेली धडक इतकी भीषण होती, की गाडीतून प्रवास करणारे पाचपैकी चौघे जागीच मृत्युमुखी पडले. पुणे-इंदोर महामार्गावर अंकाई किल्ल्याच्या बाजूने मनमाडच्या दिशेने येत असताना हा अपघात झाला. यात तौफिक शेख, दिनेश भालेराव, प्रवीण सकट, गोकुळ हिरे या चौघांचा जागीच मृत्यू झाला तर अजय वानखेडे हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 
दुसरा अपघात नाशिक – मुंबई लेनवर नवीन कसारा घाटात धबधबा पॉईंटच्या वळणावर पहाटेच्या सुमारास क्रुझरचा अपघात झाला. MH 22 U 2801 या क्रमांकाचे हे वाहन भरधाव वेगात जात असतांना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्याने वाहन पलटी होऊन रोडच्या बाजूला असलेल्या संरक्षण भिंतीला आदळुन अपघात झाला. या अपघातात दर्शना विजय कांबळे वय ११ वर्ष रा. मंठा जि. जालना ही मुलगी ठार झाली तर ७ जण किरकोळ जखमी झाले आहेत.