मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : सोमवार, 9 मे 2022 (16:05 IST)

तेलंगणा: निजामसागरच्या हसनपल्ली गेटवर भीषण अपघात नऊ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

तेलंगणातील कामारेड्डी जिल्ह्यात घडलेल्या अपघाताच्या घटनेचे वर्णन करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोकसंतप्त कुटुंबियांप्रती शोक व्यक्त केला आणि जखमी लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली, तसेच पंतप्रधान मदत निधीतून मृतांना प्रत्येकी दोन-दोन लाख रुपये तर जखमींना 50,000 रुपये आर्थिक मदत जाहीर केली.
 
तेलंगणातील निजामसागर येथील हसनपल्ली गेट येथे लॉरी आणि ऑटो ट्रॉलीची धडक होऊन अपघात झाला. या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला असून 17 जण जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. माहिती देताना पोलीस अधीक्षक कामारेड्डी श्रीनिवास रेड्डी यांनी सांगितले की, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी चालकाची ओळख पटली असून, जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.