रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: गुरूवार, 11 फेब्रुवारी 2021 (16:15 IST)

चहा प्या आणि कप खा, झिरो वेस्ट तत्वावर कोल्हापूरच्या इंजिनिअर्सने तयार केले हे कप

कोल्हापूर- घराबाहेर टपरीवर चहा पिऊन कप फेकून देण्याची सवय सर्वांनाच असते परंतू यामुळे देशभरात कचऱ्याची समस्या वाढत आहे आणि हळू हळू ही समस्या मोठं रुप धारण करत असताना कोल्हापूरच्या तीन इंजिनिअर तरुणांनी भन्नाट कामगिरी केली आहे. चहा पिऊन कप सुद्धा खाता येतील असे कप तयार करण्यात येत आहे.
 
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्लास्टिक कपला पर्याय म्हणून हे कप तयार करण्यात आलेत. कोल्हापूरच्या दिग्विजय गायकवाड, आदेश कारंडे आणि राजेश खामकर या तीन इंजिनिअर युवकांनी सुरु केलेल्या 'मॅग्नेट एडिबल कटलरी' या ब्रँड मार्फत उपलब्ध करण्यात आले आहेत. इंजिनिअर्सनी खाता येणाऱ्या बिस्किट कपचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. हे कप वापरल्याने कॅफे, टपरी आणि दुकानांमध्ये होणारा कचरा कमी होण्यास मदत होत आहे. 
 
हे बिस्किट कप एक उत्तम पर्याय ठरत आहेत. दिग्विजय यांना ही कल्पना सुचल्यावर दीड वर्षाच्या अभ्यानंतर हे शक्य झाले. सामान्य लोकांच्या खिशाला परवडणारे कप्स तयार करण्यात आले. 
 
हैदराबादमधून मशिन बनवून आणल्यानंतर शहरातील विविध फॅफे, कॅन्टीन, रेस्टॉरंट याठिकाणी कप्स पुरवले जात आगेत. विशेष म्हणजे 'झिरो वेस्ट' या तत्वावर तयार करण्यात आलेले हे कप्स काही कारणाने हे कप्स खाल्ले गेले नाही तरी फेकलेले कप्स जनावरांच्या पोटात गेले तरी त्यांना धोका नाही.