शुक्रवार, 8 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: बुधवार, 3 फेब्रुवारी 2021 (13:23 IST)

Zoom call with goat गमतीगमतीत केली 50 लाखांची कमाई

weird news
कोरोना काळात अनेकांची आर्थिक स्थिती वाईट झाल्याच्या बातम्या तर आपण ऐकल्या असतील परंतू काही वेगळं करुन कमाई करणारे मागे नव्हते. असंच काही लंकाशायरच्या एका फार्मच्या मालकाने केलं आणि गमतीगमतीत लाखो रुपये कमाई केली. त्याने कोरोना काळात लोकांना व्हिडिओ कॉल विद गोट अशी ऑ‍फर दिली होती. 
 
इंग्लंडमधील एका फार्मच्या मालकाने आपल्या कर्मचार्‍यासोबत एक योजना तयार केली आणि लोकांना फॉर्ममधील बकर्‍यांसोबत झूम कॉल करण्याची ऑफर दिली. गमीतत सुरुवात केलेल्या ही योजना लोकांना अत्यंत आवडली. त्याने एका वेबसाइटवर जाहिरात दिली आणि दुसर्‍या दिवशी त्याचा फोन कॉल्सने तर ईमेल्स देखील भरलेले होते. अनेक लोकांना याची बुकिंग करायची होती. 
 
रिर्पोटनुसार या फार्मने 500 रुपयात एका बकरीसोबत झूम कॉल करण्याची ऑफर दिली होती अशाप्रकारे त्याने 50 लाख रुपये कमावले. आश्चर्य म्हणजे हे कॉल करण्याची बुकिंग करण्यात मोठमोठ्या आयटी कंपन्यांचे कर्मचारी पुढे आहेत. सध्या फॉर्म मालकाकडे 11 बकर्‍या आहेत.
 
कोरोना काळात घरीबसल्या लोकांना काही वेगळे करायला मिळाले तर बकर्‍यांमुळे मालकाला फायदा झाला.