गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 2 फेब्रुवारी 2021 (15:40 IST)

विचित्र किंतु सत्य: स्मोकिंगमुळे शरीर पडलं पिवळं

स्मोकिंग करणे आरोग्यासाठी घातक असल्याचे सर्वांना माहित आहे. स्मोकिंग केल्याचा थेट परिणाम फुफ्फुसांवर होतो तसेच सतत सिगारेट पित असणार्‍यांचे ओठ देखील काळे पडतात पण स्मोकिंमुळे शरीर पिवळं पडताना आपण ऐकलं आहे का? नाही ना पण हे प्रकरण घडलंय चीनमध्ये. येथे स्मोकिंग करणार्‍या एक चिनी व्यक्तीचं शरीर चक्क पिवळं पडलं आहे.
 
चेन स्मोकर असलेल्या या व्यक्तीचं शरीर हळदीसारखं अगदी गडद पिवळं झालं होतं. काविळीमध्ये शरीर पिवळं पडणे सामान्य बाब आहे पण पण चीनच्या जियांग्यु प्रांतातील 60 वर्षांच्या व्यक्तीच्या शरीराचा पिवळा रंग गडद होता आणि याचं कारण म्हणजे स्मोकिंग. काविळ आजारात शरीरातील बिलिरुबीन घटकामुळे शरीर पिवळं पडतं. अशावेळी शरीराचा पिवळा रंग हा सामान्य असतो पण स्मोकिंगमुळे पिवळा रंग पडणे हे दुर्लभच दिसून आले.
 
मीडिया रिपोर्टनुसार या व्यक्तीच्या पॅनक्रियाजमध्ये मोठ्या आकाराचा ट्युमर झाल्यामुळे त्याच्या पित्त नलिका ब्लॉक झाल्या आणि त्यामुळे त्याला कावीळ झाली. ही व्यक्ती स्मोकिंग करत असल्यानं पेशींचा आकारही सामान्यपेक्षा जास्त झाला आणि अशीच परिस्थिती निर्माण झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. ऑपरेशनद्वारे व्यक्तीच्या शरीरातील ट्युमर काढण्यात आलं आहे, त्यानंतर त्याच्या त्वचेचा रंग सामान्य झाला. पण डॉक्टरांप्रमाणे जर त्याने स्मोकिंग सोडली नाही तर पुढे अनेक समस्या उद्भवू शकतात.