1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: सोमवार, 1 फेब्रुवारी 2021 (11:49 IST)

भारतातील पहिला 'इग्लू कॅफे' काश्मीरमध्ये, पर्यटक घेतायेत मज्जा

igloo cafe
काश्मीरची कडाक्याचे थंडी आणि त्यात इग्लू मध्ये बसनू गरम गरम खाण्याची-पिण्याची व्यवस्था असल्यास पर्यटकांना अजूनच मज्जा वाटणे साहजिकच आहे.
 
काश्मीर खोऱ्यात हिमवृष्टीने सर्व रेकॉर्ड तोडले असताना या बर्फाचा वापर करून नवीन आकर्षक गोष्टी निमिर्त केल्या जात आहे. विश्व प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या काश्मीरच्या गुलमर्गमध्ये पहिला इग्लू कॅफे उभारण्यात आला आहे. लोकांना आकर्षित करण्यासाठी मालकांनी यात बर्फापासून तयार टेबल मांडले आहेत ज्यावर गरमागरम जेवण वाढण्यात येतं.
 
बर्फाचा वापरुन घुमटाकृती छोटेखानी घर बांधतात, त्यांना इग्लू म्हणतात. इग्लू घरे बाहेरील देशात बघायला मिळतात. त्यावरून ही कल्पना सुचली आणि हॉटेल मालकाने 15 फूट उंच आणि 26 फूट गोल कॅफे उभारला. 15 मजुरांनी 20 दिवसात इग्लू क‌ॅफे उभारला आहे. या क‌ॅफेत 16 जणांच्या बसण्याच्या व्यवस्थेसाठी 4 टेबल्स लावल्या आहेत. या इग्लू क‌ॅफेची 'लिम्का ई बुक' मध्ये आशियातील सर्वांत मोठा 'इग्लू' अशी नोंद होईल, अशी आशा मालकाला आहे.
या कॅफेमध्ये चहा-नाश्त आणि लंचसाठी मोठ्या संख्येने स्थानिक लोक आणि पर्यटक येत आहे. सोशल मीडियावर या फॅकेबद्दल उत्सुकता बघायला मिळत आहे.