मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 16 नोव्हेंबर 2020 (15:01 IST)

ऐन दिवाळीत महाराष्ट्राचे दोन सुपुत्र सीमेवर शहीद

पाकिस्तानच्या हल्ल्यात ऋषीकेश जोंधळे शहीद झाले आहे. ऋषीकेश जोंधळे हे मुळचे कोल्हापूरचे आहेत. त्यांचं पार्थिव कोल्हापुरातल्या त्यांच्या बहिरेवाडी या मूळगावी शोकाकुल वातावरणात त्यांना निरोप देण्यात आला. भाऊबीजेच्या दिवशीच ऋषीकेश जोंधळे यांच्या चितेला त्यांच्या चुलत भावाने अग्नी दिला. या वीराला निरोप देताना संपूर्ण गाव अश्रूंच्या शोकसागरात बुडालं.
 
जम्मू काश्मीर मधील उरी सेक्टर आणि गुरेज सेक्टर दरम्यान शुक्रवारी अनेक ठिकाणी युद्धबंदी कराराचे पाकिस्तानने उल्लंघन केले. या गोळीबारात भारताचे पाच जवान शहीद झाले तर तीन नागरिकांचा मृत्यू झाला. या शहीद जवानांमध्ये महाराष्ट्राच्या दोन सुपुत्रांना वीरमरण आलं. कोल्हापूर जिल्ह्यातील बहिरेवाडी या गावाचे सुपुत्र ऋषीकेश जोंधळे आणि नागपूर जिल्ह्यातील अंबाडा सोनक गावातील भूषण सतई शहीद झाले.