मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: शनिवार, 9 जानेवारी 2021 (10:11 IST)

JKSSB मध्ये 1700 पदांवर भरती 16 जानेवारी पर्यंत अर्ज करा

जम्मू काश्मीर सेवा निवड मंडळात (JKSSB) जम्मू आणि काश्मीर नागरी सेवा तरतूद म्हणजे सिविल सर्विस प्रोविजन अंतर्गत जिल्हा,विभाग, केंद्रशासित प्रदेश संवर्गातील विविध विभागात भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 जानेवारी 2021 आहे इच्छुक उमेदवार  jkssb.nic.in. वर जाऊन अर्ज करू शकतात. एकूण 1700 पदांच्या भरतीसाठी अर्ज घेण्यात येत आहे. या पैकी 1246 पदे फायनान्स, 144 पदे ट्रान्सपोर्ट म्हणजे परिवहन, 137 पदे निवडणूक, 79 पदे संस्कृती विभागाशी संबंधित आहे.
 
अधिकृत सूचना साठी येथे क्लिक करा.
https://ssbjk.org.in/Advertisement%20No.%2004%20(Dated%2016-12-2020).pdf
 
अर्ज शुल्क - परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज शुल्क 350 रुपये घेतले जातील.
नोंदणी शुल्क नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डाद्वारे भरले जाऊ शकते.
 
ऑनलाईन अर्ज असं करावे- 
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेत स्थळावर jkssb.nic.in क्लिक करा. 
या नंतर अप्लाय वर क्लिक करा.
नोंदणीसाठी रजिस्ट्रेशन किंवा नोंदणी पेज लॉग इन करा. 
या साठी आपल्याला आपले नाव, ईमेल, पत्ता आणि मोबाईल नंबर भरावे लागणार.
आता ऑनलाईन अर्ज भरा आणि कागदपत्र अपलोड करा.
या नंतर अर्ज पूर्ण करण्यासाठी शुल्क आकारा.
 
परीक्षेचा स्वरूप असा असेल -
परीक्षे मध्ये ऑब्जेक्टिव्ह टाईप मल्टीपल चॉइस प्रश्न येतील. प्रश्न इंग्रेजी मध्ये असतील. 0.25 गुणांच्या चुकीच्या उत्तरासाठी निगेटिव्ह मार्किंग असेल. परीक्षा झाल्यावर उत्तर तपासणी पत्रक जाहीर केली जाईल. लेखी परीक्षेत अंतिम गुणवत्ता यादी, कट ऑफ गुणांच्या आधारे निवडली जाईल.