शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: बुधवार, 9 डिसेंबर 2020 (09:55 IST)

JKSSB Recruitment 2020: 7 डिसेंबर पासून सुरू होणार एसआय आणि इतर पदासाठी भरती

JKSSB Recruitment 2020: जम्मू काश्मीर सेवा निवड मंडळात (JKSSB) एस आई, असिस्टण्ट सहाय्यक कंपायलर, विभाग सहाय्यक आणि इतर पदांचा 1997 रिक्त पदांसाठी ऑनलाईन अर्ज 7 डिसेंबर पासून सुरू झाले आहेत. 

जेकेएसएसबी मध्ये ही भरती प्रक्रिया काश्मिरातील निर्वासित काश्मिरी पंडितांसाठी जाहीर केलेल्या पंतप्रधान पॅकेज अंतर्गत सुरू करण्यात आली आहे. 7 डिसेंबर 2020 पासून जेकेएसएसबी भरतीची नोंदणी सुरू झाल्यावर अर्ज करणाच्या इच्छुक उमेदवार jkssb.nic.in वर संबंधित पदांसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.
 
जम्मू काश्मीर सेवा निवड मंडळ एकूण 1997 पदांना भरण्यासाठी ही भरती मोहीम सुरू करत आहे. या मध्ये 647 रिक्त पदांवर सहाय्यक कंपायलर, 550 रिक्त पद चतुर्थ श्रेणींसाठी, 350 रिक्त पद सब इन्स्पेक्टर कमर्शियल टॅक्स, 300 पद विभागीय सहाय्यक आणि 50 -50  रिक्त पद सहाय्यक 3, फील्ड सुपरवायझर मशरूम आणि सहाय्यक स्टोअर कीपर साठी आहेत. सब इन्स्पेक्टर, कमर्शिअल टॅक्स पदांसाठी उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण केलेली असावी. तर सहाय्यक कंपायलर आणि फील्ड असिस्टंटच्या पदासाठी अर्ज करणाऱ्यांना 10+2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
 
अधिक माहितीसाठी JKSSB च्या अधिकृत संकेत स्थळावर http://jkssb.nic.in/ क्लिक करून अधिसूचना वाचा.