रविवार, 26 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: मंगळवार, 1 डिसेंबर 2020 (09:32 IST)

AAI Recruitment 2020: एयरपोर्ट ऍथॉरिटी ऑफ इंडियाच्या बंपर नोकऱ्या, त्वरा करा

AAI Recruitment 2020: एयरपोर्ट ऍथॉरिटी ऑफ इंडिया (AAI)ने व्यवस्थापक आणि कार्यकारी पदांसाठी अनेक भरती काढल्या आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार AAI च्या अधिकृत संकेत स्थळांवर जाऊन या पदासाठी अर्ज करू शकतात. कनिष्ठ कार्यकारी म्हणजे ज्युनिअर एग्जीक्यूटिव आणि व्यवस्थापक किंवा मॅनेजर या पदांच्या रिक्त जागेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 जानेवारी 2021 रोजी ठेवण्यात आली आहे.
 इच्छुक उमेदवार aai.aero च्या माध्यमातून  aai.aero साठी अर्ज करू शकतात. 
 
या साठी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे की या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना 60 हजारांपासून 1 लाख 80 हजारापर्यंत  पगार मिळणार आहे. हे सर्व पदे चांगल्या पगाराची असून या मध्ये मॅनेजर (फायर सर्व्हिस) पासून ते मॅनेजर (टेक्निकल) आणि कनिष्ठ कार्यकारी (एअर ट्राफिक कंट्रोल) पदांसाठी भरती करण्यात येणार आहेत.
 
एकूण 368 पदांसाठी भरती काढण्यात आली आहे -
ज्युनिअर एग्जीक्यूटिव आणि व्यवस्थापक या पदांच्या रिक्त जागेसाठी एकूण 368 भरती काढण्यात आल्या आहे. या सर्व पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 15 डिसेंबर पासून सुरू होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जानेवारी 2021 ठेवण्यात आली आहे. या रिक्त जागांमध्ये मॅनेजर (फायर सर्व्हिस) चे एकूण 11 पदे आहे आणि मॅनेजर (टेक्निकल) ची 2 पदे आहे. 
 
या नोकऱ्यांमध्ये ज्युनिअर एग्जीक्यूटिव (एअर ट्राफिक कंट्रोल) च्या 264 रिक्तपदांसाठी अर्ज निघाले आहेत. त्याच बरोबर ज्युनिअर एग्जीक्यूटिव (एअर ऑपरेशन्स) च्या एकूण 83 पदांसाठी रिक्त पद काढण्यात आले आहे. ज्युनिअर एग्जीक्यूटिव (टेक्निकल) या साठी एकूण 8 पदे रिक्त आहेत. 
 
वय मर्यादा- मॅनेजरच्या रिक्तपदांसाठी जास्तीत जास्त वय मर्यादा 32 वर्ष मागितली आहे. 
दिव्यांग, एससी, एसटी आणि ओबीसी यांना वयोमर्यादेची सूट देण्यात आली आहे.