गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 29 डिसेंबर 2020 (15:57 IST)

काश्मीर मुद्द्यावरून भाजपाचे अतुल भातखळकर यांची शिवसेनेवर टीका

“वर्षभरापूर्वी मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियावर जेएनयुतील तुकडे गँगच्या समर्थनार्थ निदर्शने करणाऱ्या ज्या निदर्शकांच्या हातात ‘काश्मीर मुक्त करा’चे फलक होते, त्यांच्या विरुद्धची तक्रार मागे घेऊन ठाकरे सरकारने तुकडे गँगची पाठराखण केली आहे. हाच आहे शिवसेनेचा खरा चेहरा”, असं ट्विट भाजपचे अतुल भातखळकर यांनी केलं आहे.
 
जानेवारी २०२०मध्ये हा प्रकार घडला असताना यावरून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. “हे आंदोलन नेमकं कशासाठी सुरू आहे? काश्मीर मुक्तीची घोषणा आंदोलनात कशी? मुंबईत असे फुटीरतावादी खपवून का घ्यायचे? मुख्यमंत्री कार्यालयापासून अवघ्या दोन किमी अंतरावर काश्मीर मुक्त भारताची घोषणाबाजी होते, हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खपवून घेणार का?”, असे सवाल फडणवीस यांनी ट्विटरवरून राज्य सरकारला केले होते.