रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 24 डिसेंबर 2020 (08:30 IST)

स्थानिक पातळीवर शिवसेनेसोबत जुळवून घ्या : अजित पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीकडून बोलावण्यात आलेल्या बैठकीत बोलताना अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांना स्थानिक पातळीवर शिवसेनेसोबत जुळवून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून  विधानसभा व लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांची बैठक बोलावण्यात आली. 
 
यावेळी अजित पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. अजित पवार म्हणाले, “आपल्याला शिवसेनेबरोबर कायम राहायचे आहे. महाविकास आघाडी‌ अस्तित्वात आल्यानंतर स्थानिक पातळीवर खटके उडत आहेत. पण आपल्याला शिवसेनेबरोबर जुळवून घ्यायचे आहे. त्यामुळे शिवसेनेबरोबर स्थानिक‌ पातळीवर जमवून घ्या” अशा स्पष्ट सूचना पवार यांनी बैठकीत पदाधिकाऱ्यांना दिल्या.