बिबट्यासोबत कुत्रा 7 तास अडकला टॉयलेटमध्ये, बाहेर निघल्यावर काय बघायला मिळाले
बिबट्या समोर आल्यावर प्रत्येकाची घाबरगुंडी उडेल अशीच कल्पना आपण करु शकतो पण बिबट्याबरोबर एका खोलीमध्ये बंद होण्याची वेळ आली तर कल्पना करुन सुद्धा घाबरायला होतं. पण
अशी एक घटना एका कुत्र्याबरोबर घडली आणि काही मिनिटांसाठी नव्हे तर तब्बल 7 तास कुत्रा एका बिबट्यासोबत शौचालयामध्ये अडकला होता. विशेष म्हणजे कुत्रा सुखरुप आहे. हे कसे घडले
ते तर माहित नाही परंतू या दोघांचा एक फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
दक्षिण कन्नड जिल्ह्यातील बिलिनेले गावात ही घटना घडली. येथे एक महिला सकाळी 7 वाजता घराबाहेर असलेल्या शौचालयामध्ये जात असताना तिची नजर आत असलेल्या बिबट्यावर पडली आणि तिने लगेच बाहेरुन दार बंद करुन घेतले.
नंतर रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आले यासाठी सुमारे सात तास लागले. दरम्यान ट्विटर अकाउंटवर शौचालयात अडकलेल्या बिबट्या आणि कुत्र्याचा फोटो शेअर केला आहे. टॉयलेटच्या छतावरील पत्रे काढून हा फोटो काढण्यात आला आहे.
वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याला पकडण्यासाठी अथक प्रयत्न केले पण बिबट्या पळून गेला. नंतर कुत्र्याला जिवंत बाहेर काढले. हा कुत्रा जिवंत कसा राहिला हे जाणून घेण्याबाबत सर्वांना उत्सुकता होती. नंतर भारतीय वनसेवा अधिकारी प्रविण कासवान यांनी या घटनेचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले की 'प्रत्येक कुत्र्याचा एक दिवस असतो. हा कुत्रा बरेच तास बिबट्यासोबत कैद राहून सुद्धा जिवंत बाहेर आला. हे फक्त भारतामध्येच होऊ शकते'.
कुत्र्याला स्थानिक नागरिक 'बोलू' या नावाने हाक मारतात.