विमानाच्या लँडिंग गिअरला चिकटून 19 हजार फुट उंचीवरही सुखरुप 16 वर्षीय मुलगा
विमानाच्या खालच्या भागात लँडिंग गिअरला चिकटून 16 वर्षीय मुलाने प्रवास केल्याची आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. लंडनहून उड्डाण घेतल्यानंतर जेव्हा फ्लाइट नेदरलँडच्या हॉलेंड पोहचली तेव्हा स्टाफला लँडिंग गिअरजवळ एक मुलगा असल्याचं दिसलं.
साधरण 19 हजार फूट उंचीवर फार जास्त थंड वातावरण असल्याने या मुलाला हायपोथर्मिया झाला आहे. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल केले आहे. एका मीडिया हाऊच्या रिर्पोटनुसार, या मुलाने लँडिंग गिअरला चिकटून साधारण 510 किलोमीटरचा प्रवास केला. हॉलेंडच्या मास्ट्रिच्ट एअरपोर्टवर फ्लाइट लँड केल्यावर त्याला उतरविण्यात आले.
हा मुलगा तुर्की एअरलाइन्सच्या कार्गो फ्लाइटच्या लँडिंग गिअरला चिकटला होता. एक दिवसाआधीच ही फ्लाइट केनियाहून इस्तांबुल मार्गे लंडनला पोहोचली होती.