शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 2 मार्च 2021 (21:32 IST)

कोल्हापूर कोरोना साहित्यातील घोटाळ्याचा तपशील भाजपकडून प्रसिद्ध

कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना साहित्यातील घोटाळा प्रकरणी  भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही चौकशीची मागणी केली आहे. भाजपचे जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी पत्रकार परिषद घेऊन कोरोना साहित्यातील घोटाळ्यासंदर्भातील सविस्तर तपशील प्रसार माध्यमांसमोर मांडला केला. 
 
निंबाळकर म्हणाले, ८८ कोटी रुपयांची खरेदी करण्यात येऊन त्याची बिले अदा करण्यात आली आहेत. आणखी ४५ कोटी रुपयांची मागणी केली आहे. मात्र ही सर्व खरेदी शासनाचे नियम डावलून मनमानी पद्धतीने करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, शल्यचिकित्सक यांच्या समितीने ही खरेदी केली आहे. समितीचे सहअध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल व कंत्राटी आरोग्य अधिकारी नितीन लोहार यांच्या स्वाक्षरीने बिले देण्यात आली आहेत. अनेक पात्र कंपन्यांना डावलून राजकीय हितसंबंध असणाऱ्या लोकांच्या कंपन्यांकडून खरेदी केली असल्याचे आरोप भाजपाने केले आहेत.
 
थर्मल स्कॅनरची किंमत अकराशे रुपये असताना ते दहा हजार रुपयांना खरेदी करण्यात आले. मास्क सुरुवातीला दोनशे पाच रुपयांनी खरेदी केले नंतर ते केवळ १४ रुपयाला खरेदी केली. हँडसनीटायझर सुद्धा प्रारंभी अडीचशे रुपये अर्धा लिटर खरेदी केले तर नंतर ते ६० रुपये लीटरला खरेदी केले. पीपीई किटमध्ये ही मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला आहे. बाजारात तीनशे पन्नास रुपयाला कीट मिळत असताना येथे सतराशे रुपयांनी खरेदी केलेली आहे. जिल्ह्यात साडेतीन हजार बेड खरेदी केले आहेत. बाजारात सात हजार २२५ रुपयांना बेड मिळत असताना साडेबारा हजार रुपये प्रती बेड दराने खरेदी केली आहे. अशी माहीती  निंबाळकर यांनी दिली.