गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वर्ल्ड कप 2023
Written By
Last Modified: शनिवार, 7 ऑक्टोबर 2023 (13:36 IST)

Special Vande Bharat train भारत-पाकिस्तान सामन्यासाठी विशेष वंदे भारत ट्रेन कधी आणि कुठून सुटणार?

vande bharat
special Vande Bharat train भारत आणि पाकिस्तानचा सामना पाहण्यासाठी देश-विदेशातील क्रिकेटप्रेमी अहमदाबादला पोहोचत आहेत. अहमदाबादला जाणारी सर्व विमाने आधीच फुल्ल आहेत. शिल्लक राहिलेल्या तिकिटांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. अहमदाबादमधील हॉटेल बुकिंग फुल्ल आहे. बससेवाही तुडूंब झाल्या आहेत. भारतीय रेल्वेने हीच संधी साधली आहे. क्रिकेटप्रेमींच्या सोयीसाठी रेल्वेने अहमदाबादसाठी विशेष वंदे भारत ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
 
विशेष वंदे भारत ट्रेन कधी आणि कुठून सुटणार?
भारत-पाकिस्तान सामन्यासाठी विशेष वंदे भारत ट्रेन चालवली जाणार आहे. विशेष सेवांची वेळ अशी ठेवण्यात आली आहे की, क्रिकेटप्रेमी सामना सुरू होण्यापूर्वी अहमदाबादला पोहोचू शकतील आणि सामना संपल्यानंतर घरी परततील. भारत-पाकिस्तान सामन्यासाठी मध्य प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्रातून विशेष वंदे भारत ट्रेनची सेवा उपलब्ध केली जाणार आहे. या विशेष सेवांची वेळ अशी आहे की, क्रिकेटप्रेमींना अहमदाबादमध्ये राहण्याची गरज भासणार नाही. सामना संपल्यानंतर चाहते घरी परतू शकतात. तुम्ही या स्पेशल वंदे भारत ट्रेनने प्रवास करत असाल तर तुम्हाला तिथे हॉटेल किंवा रूम बुक करण्याची गरज नाही, असे सांगितले जात आहे. याबाबतचे सविस्तर वेळापत्रक लवकरच येण्याची अपेक्षा असल्याचे म्हटले जात आहे.  
 
दरम्यान, भारतीय चाहत्यांचा आणि टीम इंडियाचा उत्साह वाढवण्यासाठी या विशेष ट्रेन भारतीय तिरंगा रंगात रंगवल्या जाणार आहेत. हा प्रवास अविस्मरणीय बनवण्यासाठी ट्रेनमध्ये देशभक्तीपर गीते ऐकवली जाणार आहेत. रेल्वेसोबतच गुजरात मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडनेही सामन्यांची तयारी केली आहे. सामन्याच्या दिवसांमध्ये मेट्रो ट्रेनच्या वेळा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
१४ ऑक्टोबर रोजी भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय रेल्वेनेही पुढाकार घेऊन विशेष वंदे भारत ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे.